another lockdownफिरा अजून फिरा लोकडाऊन होण्याची शक्यता !

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन अनेकदा विनंती, दंड करून देखील बाहेर फिरणारे काही कमी होताना दित नाहीये, आता तर शंभर तपासण्यांमागे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन शहरात लॉकडाउन करण्याच्या विचारात आहे असे समजते आहे.लोकांकडे त्यांची कारणे आहेत तर प्रशासनाकडे त्यांची कारणे आहेत. another lockdown

दिनांक:  25 मार्च 2021 नाशिक*  
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2331*
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – *2994*
नाशिक मनपा-      1739

नाशिक ग्रामीण-     1160

मालेगाव मनपा-     0047

जिल्हा बाह्य-         0048

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2274*
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -12*

नाशिक मनपा-        5

मालेगाव मनपा-       1

नाशिक ग्रामीण-       4

जिल्हा बाह्य-           2

 

महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने देखील याला काही अंशी सहमती दर्शवली असून, प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय करून शहरात काही दिवसांसाठी लॉकडाउन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. दरम्यान, येत्या दि. . २६रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीतही शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत्या संख्येचा मुद्दा अहवालाच्या माध्यमातून ठेवला जाणार आहे.

बैठकीत मांडणार अहवाल
दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येच्या बाबतीत देशातील दहा शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक सातवा आहे. यामुळे प्रशासनानेदेखील कोरोना नियंत्रणासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत, सोबतच अनेक दिवसापासून मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असल्या तरी, नागरिकांकडून मात्र तंतोतंत पालन होत नाही हे दिसून आले आह. महापालिकेच्या कोविड सेंटर व रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. सध्या शहरात अंशत: लॉकडाउन असला तरी त्याचा फारसा प्रभाव दिसत नाही. लॉकडाउन झाल्यास किमान कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. येत्या शुक्रवारी पालकमंत्री भुजबळ यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यापूर्वी प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना अहवाल सादर करून त्यांच्यामार्फत अंतिम अहवाल या बैठकीत ठेवला जाणार असल्याचे समजते.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यामार्फत अहवाल सादर केला जाईल. -कैलास जाधव, महापालिका आयुक्त

पोलीस कोविड सेंटर सुरू तर ठक्कर डोम, मेरी कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होणार.

नाशिक शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिस कर्मचारी, अधिकारीदेखील बाधित होत आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तत्काळ उपचारासाठी जागा मिळावी यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला व सोमवारी (दि. २२) या सेंटरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
तर नाशिक शहरात दिवसाला सरासरी हजार ते बाराशे कोरोना रुग्ण निघत आहेत, परिणामी सक्रिय रुग्णसंख्या १२ हजारांच्या वर गेल्याने महापालिकेने आता समाज कल्याण कोविड सेंटर पाठोपाठ मेरी आणि ठक्कर डोम येथील कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे. पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंगळवारी या दोन्ही ठिकाणच्या सुविधांची पाहणी करीत ही कोविड केअर सेंटर तातडीने सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.another lockdown

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.