महासभा : फेर सर्वेक्षण, अनधिकृत ५९ हजार मिळकतींना  नोटीसा रद्द : महापौर

आयुक्त मुंढे यांनी पाठवल्या होत्या नोटीसा

नाशिक : तुकाराम मुंढे मनपातून बदली होवून गेले आणि सत्तधारी भाजपने त्यांनी गेतलेले सर्व निर्णय मागे घेण्याचे  ठरवले असे दिसून येते  आहे. यात प्रमुख असा शहरातील ५९ हजार मिळकतींना अनधिकृत ठरवत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने पारित झालेल्या नोटिसा तातडीने रद्दबादल करण्याचा आदेश महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी ( दि. १९) झालेल्या महासभेत प्रशासनाला दिला आहे. सोबतच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच फेरसर्वेक्षण करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम अनधिकृत बांधकाम अधिकृत होतेय की काय असा प्रश्न समोर आला आहे.

Tukaram-Mundhe transferred, Nashik News On Web Latest Updates Marathi Batmya, Tukaram Mundhe appointed joint secretary planning department mantralay mumbai
Tukram mundhe

महापालिकेने उत्पन्नाच्या वाढीसाठी खासगी कंत्राटदारांमार्फत शहरातील ३ लाख ९० हजार मिळकतींचे सर्वेक्षण करत, ५९ हजार मिळकती अनधिकृत बांधकामे शोधून काढली होती. यातील संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. नोटिसांनुसार जर दंड भरावा लागला असता, तर प्रत्येकाला जवळपास एक लाख रुपये दंड भरावा लागला असता  त्यामुळे अनेक राजकारणी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराज होते. आता महापौरांनी नोटीसा रद्द केल्याने कोणाचे भले करत असेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुकाराम मुंढे बदलून गेल्यावर प्रथम झालेल्या महासभेत यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे, काँग्रेस गटनेता शाहू खैरे, नगरसेवक गुरमित बग्गा यांनी लक्षवेधी सादर केली. शेत जमिनींवर तसेच स्टील्ट पार्किंगवर आकारण्यात आलेला कर, पूर्णत्वाचे दाखले नसतानाही आकारण्यात आलेली घरपट्टी, ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सूट देण्याच्या नियमात परस्पर केलेला बदल, अकुशल कामगारांकडून केलेले इमारतींचे सर्वेक्षण, त्यातून निर्माण झालेल्या त्रुटी, घरपट्टी वाढीचा महासभेचा ठराव असतांना तत्कालीन आयुक्तांनी पारित केलेले वाढीचे परिपत्रक अशा मुद्द्यांवर तब्बल ४ तास चर्चा करण्यात आली आहे.

मुंढे यांच्यावर जोरदार टीका तर नवीन आयुक्त गमे यांचे स्वागत

तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर राधाकृष्ण गमे यांची महापालिका आयुक्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते महासभेला उपस्थित होते. यावेळी गमेंचे स्वागत करतानाच माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढले आहेत. शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांनी तर तक्रारींचा पाढाच वाचला आहे. एक कोटींचा विकासनिधी देण्याची मागणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. महापालिका क्षेत्रातील २३ खेड्यांच्या विकासासाठी चार कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी यावेळी केली. महासभेतील महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये नवीन नाशिक अर्थात सिडको परिसरातील पेलीकन पार्कच्या जागेवर सेंट्रल पार्क विकसित केले जाणार असून त्यासाठी ३४ कोटी १२ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहेत. शहरातील दिव्यांगांसाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी १७ कोटी ८९ लाख रुपये निधीची तरतूद सोबतच गंगापूर शिवारात क्रीडांगण विकासासाठी ३ कोटी १५ लाख रुपये निधीची तरतूद केली जाणार आहे. तर शहरातील उद्याने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे देखभालीस देणे असे सुद्धा मंजूर केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.