Nashik District Hospital नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच घरी नवर्‍यानेही घेतला गळफास ; सातपूर

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीचा मंगळवारी (दि.30) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समजताच हा धक्का पचवू न शकल्याने सकाळी पतीनेही राहत्या घरी गळफास घेत मृत्युला कवटाळले. ही धक्कादायक घटना नाशिकमधील सातपुर भागातील श्रमीकनगर वसाहतीत घडली. या घटनेने संपुर्ण शहर हादरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.Nashik District Hospital

श्रमिकनगर माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार ( 52) यांच्या पत्नी संगीता पवार (45) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मोठा  मुलगा आणि मुलगी देखील होते. वडिलांना घरी पाठवून भाऊ, बहीण रुग्णालयातच आईजवळ थांबलेले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता पवार यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.
मातृछत्र हरपल्याने या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोघांनी रुग्णालयातच टाहो फोडला. पवार यांच्या मुलाने स्वतः ला सावरत  वडिलांना मोबाईल वर संपर्क करुन ही दुःखद वार्ता कळविली.

ही घटना आज मंगळवारी पहाटे घरी असलेल्या तिच्या नवर्‍याला कळविण्यात आली. या पती पत्नीस एक मुलगा व एक मुलगी आहे.
पत्नी मयत झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे रवींद्र तुळशीराम पवार या पन्नास वयाच्या तिच्या पतीने पहाटे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने वडलांना फोन लावला.ते फोन का उचलत नाहीत, म्हणून तो घरी आला असता,हा धक्कादायक प्रकार त्याला पहायला मिळाला.
अवघ्या एका रात्रीत पती पत्नीची अशा दुर्दैवी पध्दतीने जीवनयात्रा संपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.Nashik District Hospital

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.