तब्बल चार वर्षांनी ‘डॅडी’ आले दगडी चाळीत

नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे ‘डॅडी’ दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली.

काहींनी हारही घातले. त्या वेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता ‘डॅडीं’च्या वेशात चक्क मकरंद देशपांडे होते. मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द ‘डॅडी’ असल्याचाच भास सर्वांना झाला. मकरंद देशपांडे यांनी सुद्धा ‘डॅडीं’चे व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. दगडी चाळीत जाण्याचे खरं तर खास निमित्त होते.

तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संगीता अहिर मुव्हीज निर्मित ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.   ‘दगडी चाळ २ ‘ या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली असून शूटिंग सुरू झाले आहे. ‘दगडी चाळ २’ मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे.  तर या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. मग तयार राहा पुन्हा एकदा तोच दरारा अनुभवण्यासाठी कारण ‘चुकीला माफी नाही’!

Makrand Deshpande as Daddy Arun gavali Mumbais Don
मकरंद देशपांडे अरुण गवळी च्या गेटअपमध्ये दगडी चाळ येथे उपस्थित.

After four years, Daddy is back in Dagdi Chawl
On Navami, the residents of Dagdi Chawl were thrilled when they saw a familiar persona walk into their premises. Known to be a stronghold of Arun Gawli aka Daddy, the people were almost sure that they saw Daddy walk into Dagdi Chawl. The grand entry, inimitable style and a huge convoy further raised the excitement.


Soon, it was revealed that the person wasn’t Gawli, but actor Makrand Deshpande. Mac, as Deshpande is affectionately called, was at the chawl to perform the Devi puja on Navami.
In fact, it was a double dhamaaka as the official announcement of the movie ‘Dagdi Chawl 2’ was also made here, slated to release in 2020. 
Makrand entered the premises dressed like the real Arun Gawli and some people even came to touch his feet, and seek blessings, mistaking him for the real Daddy. 


The actor earned appreciation for his portrayal of Daddy in Dagdi Chawl and he is all set to step into the shoes of the character for the second time now. 

Under the banner Sangeeta Ahir Moviez, the film has been produced by Sangeeta Ahir and Krrish Ahir and the shoot has already begun a while ago. Dagdi Chawl 2 reunites Ankush Chaudhari and Pooja Sawant in lead roles. The film is directed by Chandrakant Kanse and music is helmed by Amitraj. 
So, are you all ready for another thrilling journey? Don’t make the mistake of missing out on this one because ‘Chukila Maafi Naahi’

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.