लासलगाव वार्ताहर- गेल्या अकरा दिवसांपासून बाजार समितीतील कांदा आवक बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपकाळात आर्थिक झळ वेगळी सोसावी लागली. संप काळात जिल्ह्यातील सर्व भागातील शेतकरी संपात सामील झाल्याने कांद्याची संपूर्ण बाजारपेठ ठप्प झालेली होती. अकरा दिवसांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर येथील मुख्य बाजार आवारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक बघायला मिळाली.३१ मे ला उन्हाळ कांद्याला सरासरी ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले होते.३१ मे च्या तुलनेने आज उन्हाळ कांद्यालया १२० रुपये प्रति क्विंटल जास्त ने भाव मिळाला आहे.
शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या बाजार समिती आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. आज कृषी उत्पन्न बाजार उन्हाळ कमीत कमी २५०,कांद्याला सरासरी ५७० तर जास्तीत जास्त 687 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने लासलगाव बाजारपेठे उत्साह दिसू लागला.
दिनांक 29/05/2017
उन्हाळ कांदा आवक 28,166 क्विंटल
बाजारभाव रुपये प्रती क्विंटल
उन्हाळ कांदा 250 – 641 – 480
दिनांक 30/05/2017
उन्हाळ कांदा आवक 25,626 क्विंटलबाजारभाव रुपये प्रती क्विंटल
उन्हाळ कांदा 225 – 641 – 480
दिनांक 31/05/2017
उन्हाळ कांदा आवक 20,253 क्विंटल बाजारभाव रुपये प्रती क्विंटल किमान – कमाल- सरासरी
उन्हाळ कांदा 200-626-450