प्रशासकीय कामकाजात गतिमानता व सुसुत्रता गरजेची विभागीय आयुक्त महेश झगडे

 सामान्य जनतेचा प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रशासकिय कामकाजात गतिमानता येऊन सुसूत्रतेने कामे करणेचे गरजेचे आहे, या दृष्टीने विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी कालबध्द कार्यवाही करावी असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

विभागीय आयुक्त  कार्यालयात आयोजित नाशिक विभागातील महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्याशाळेचे आयोजन श्री झगडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्णन बी., श्री. किशोर राजे निंबाळकर, श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, श्री. दिलीप पांढारपट्टे, श्री. अभय महाजन, अप्पर आयुक्त श्री. जे.टी.पाटील,  महसूल उपायुक्त श्री. दिलीप स्वामी, उपायुक्त श्री. रघनाथ गावडे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री.झगडे म्हणाले, शासकिय कार्यालयांमध्ये कामाच्या पध्दतींमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शकता व गतिमानता आणल्यास जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण होईल. नागरीकांना सहकार्य होईल असे कायदयाच्या चौकटीत राहून भ्रष्टाचारमुक्त कामकाज करण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. याबाबतच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन जनतेस न्याय दिला जावा, असे ते म्हणाले.

श्री.झगडे म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीने  कामे केली गेली पाहिजे, आपल्या कर्मचाऱ्यांकडूनही कामे करुन घेतली पाहिजे. निवडणूक कालावधी तसेच आचारसंहिता काळात देखील प्रशासकिय कामकाज प्रभावीपणे केले जावे असे ते म्हणाले.

याप्रसंगी उपायुक्त श्री.स्वामी यांनी विभागातील जिल्हानिहाय कामकाजाबाबत सादरीकरण केले. यावेळी कामकाजामध्ये वस्तुस्थिती तपासून न्यायिक पध्दतीने कामे करण्यात यावीत. अर्धन्यायिक कामकाजामध्ये कमतरता राहणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या. तालुका, जिल्हा पातळीवरील तक्रारी घेऊन नागरीक विभागीय कार्यालयात पोहोचत असल्याने त्या पातळीवरील यंत्रणेने  कामकाजातील कमतरता शोधून त्यावर कारवाई व उपाययोजना करणेची गरज आहे,असे ते म्हणाले.

शासनाच्या प्राधान्याचे विषय, जनतेकडून प्राप्त होणारी निवेदने, लोकशाही दिनातील तक्रारींवरील कार्यवाही तसेच विभागांतर्गत विविध कामकाजात सुधारणा होण्यासाठी त्यावरील कारवाई व उपाययोजनांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यशाळेस सर्व नाशिक विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,  तहसिलदार उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.