lions on Russian streets कोरोनात लोक मुजोर! व्लादिमीर पुतिन यांनी रस्त्यावर सोडले 800 सिंह, वाघ? वाचा सत्य

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. अनेक देशांनी शहरं आणि राज्यात लॉकडाउन घोषित केला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर रशिया (Russia) मध्ये सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. lions on Russian streets

यामध्ये राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन ( President Vladimir Putin) यांनी लोकांनी घरात राहावं यासाठी आवाहन केलं. पण, लोकं काही ऐकायचं नाव घेत नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर 800 सिंह आणि वाघ सोडले आहे.

पुतिन यांचा हा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. लोकं वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. एका व्यक्तीने हा मॅसेज शेअर करत म्हटलं की, ‘पुतिन यांनी रशियन लोकांना दोन पर्याय दिले आहे एक तर दोन आठवडे घरात राहा किंवा 5 वर्ष जेलमध्ये राहावं. मध्ये कोणताच रस्ता नाही. लोकांनी घरातून निघू नये म्हणून रस्त्यावर 800 सिंह आणि वाघ सोडले आहे. lions on Russian streets

Nasir Chinioti ناصر چنیوٹی@_Chinioty

#Covid_19#StayAtHome
Vladimir Putin has given Russians two options.

You stay at home for 2 weeks or you go to jail for 5years.
No middle ground.

RUSSIA: Vladimir Putin has Dropped 800 tigers and Lions all over the Country to push people to stay Home.. Stay Safe Everyone!!

View image on Twitter
View image on Twitter

18.4K11:32 AM – Mar 22, 2020Twitter Ads info and privacy11.5K people are talking about this

रशियात कोरोनाचं थैमान

रशियामध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. 300 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णं आढळले आहे. तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

Mohammad Ahmed@MohammadAhmedDh

#Covid_19
Vladimir Putin has given Russians two options
You stay at home for 2 weeks or you go to jail for 5years
No middle ground
RUSSIA Vladimir Putin has Dropped 800 tigers and Lions all over the Country to push people to stay Home.. Stay Safe Everyone!

View image on Twitter
View image on Twitter

381:15 PM – Mar 22, 2020Twitter Ads info and privacy23 people are talking about this

फॅक्ट चेकमध्ये निघालं खोटं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मॅसेज तपासून पाहिला असता हे खोटं असल्याचं समोर आलं आहे. खरंतर हा व्हायरल झालेला फोटो 4 वर्षांपूर्वीचा आहे.

गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने १५ एप्रिल २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या “डेली मेल” चा एक वृत्त सापडलं. या वृत्तानुसार कोलंबस नावाच्या या सिंहाला जोहान्सबर्गमधील एका प्रोडक्शन क्रूने चित्रीकरणासाठी आणले होते. तर “न्यूयॉर्क पोस्ट” च्या दुसर्‍या वृत्तात असं म्हटले आहे की चित्रीकरणाला परवानगी मिळाली नव्हती.

जोहान्सबर्ग रोड्स एजन्सीचा हवाला देण्यात आला आहे. चित्रीकरणाला मान्यता मिळाली नव्हती तरीही या प्रोडक्शन कंपनीने रस्ते बंद न करताही सिंहाला रस्त्यावर सोडण्याची जोखीम पत्करली होती.

व्हॉट्सअपवर या चित्रीकरणाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवर ब्रेकिंग न्यूजची ग्राफिक्स प्लेट लावण्यात आली आहे आणि सांगितलं गेलं की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून रशियाने त्यांच्या रस्त्यावर ५०० पेक्षा अधिक सिंह सोडले आहेत.

मात्र फॅक्ट चेकनुसार ही ग्राफिक्स प्लेट कोणत्याही वृत्तवाहिनीशी संबंधित नाही. हा फेक फोटो वेबसाइटच्या आधारे बनवण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या सिंहाच्या फोटोचा रशिया आणि पुतीन यांच्याशी काहीही संबंध नाही. २०१६ मधील एका शुटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. त्यामुळे मॅसेजमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णत: खोटा आहे. lions on Russian streets

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.