खुनाचा आरोप : कैदेतील भाजपचा नगरसेवक  शेट्टी पोलिस बंदोबस्तात महासभेत

खुनाच्या आरोपावरुन  कारागृहात असलेला भाजपचा नगरसेवक  शेट्टी पोलिस बंदोबस्तात महासभेत

नाशिक :मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपावरुन ताब्यात असलेल्या भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याला न्यायालयाच्या परवानगीने आज एक तासासाठी महापालिकेच्या महासभेला उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. आज दुपारी शेट्टी पोलिसांच्या बंदोबस्तात महासभेला एक तास उपस्थित होता. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे.

कारागृहात खुनाच्या आरोपावरून  कैदेत असलेला भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याला टेक्निकल अरतात  तांत्रिक कारणाने न्यायालयाने महासभेस उपस्थित राहण्यासाठी एक तासाचा अवधी दिला होता. विशेष म्हणजे या शेट्टी प्रेमा पोटी सोमवारी होणारी महासभा रद्द करण्यात आली होती.

दुपारी एक वाजता जवळपास चोख बंदोबस्तात  आठ पोलिसांच्या गराड्यात महासभेत तो आला होता. मात्र सुरक्षा कारणांने पोलिस सभागृहात नगरसेवकांच्या आसनांवर बसले.यावेळी संशयित आरोपी  नगरसेवक शेट्टी याने भाजपच्या विविध नगरसेवका सोबत हस्तांदोलन सुद्धा केले आहे. जेव्ह्या शेट्टी याने आपली रीतसर उपस्थिती नोंदवली तेव्हा नियमित  कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.

यामध्ये महापालिका अधिनियम 10 ब अन्वये सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ महासभेस उपस्थित न राहिलेल्या सदस्याचे सदस्यत्व रद्द होते. यामध्ये  भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी हा पंचवटीतील गुन्हेगाराच्या खुनाच्या आरोपावरुन 26 मे, 2017 रोजी अटक झाली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीचा आदेश असल्याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी आहे. यमात्र आगोदर  शेट्टी हा 18 मे रोजी झालेल्या महासभेला उपस्थित होते. मात्र आता त्याला ६ महिने पूर्ण होत होते त्यामुळे भाजपच्या पुढाकाराने नगरसेवक शेट्टी याला मदत व्हावी म्हणून महासभा तहकुब केली होती. आणि आज तो महापालिकेत हजर राहिला आहे. कोणत्याही महापालिकेत अशी घटना या आगोदर घडली नसावी असे चित्र आहे.

पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले याला १ ऑक्‍टोबर २०१५ ला इगतपुरी परिसरात मद्य पाजून जिवंत जाळण्यात आले होते. या खुनाची उकल गेल्या मे महिन्यात झाली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, अविनाश कौलकर, रोहित कडाळे, श्‍याम महाजन यांना अटक करण्यात आली. ज्वाल्याचा खून भाजपचा नगरसेवक व सराईत गुन्हेगार हेमंत शेट्टी याच्या सांगण्यावरून झाल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी शेट्टी सध्या नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.