Accident Death Red-cross Signal रहदारीसाठी बेशिस्त असलेल्या रेड क्रॉस सिग्नलवर कारने धडक दिलेल्या तरुणीचा मृत्यू

अतिशय बेशिस्त वाहतूक असलेल्या आणि सिग्नल सोडाच मात्र रस्ता ओलांडण्यायची सुद्धा कोणी काळजी न करणाऱ्या जुने नाशिक मधील रेड क्रॉस सिग्नल या ठिकाणी एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते मात्र तिची लढाई अपयशी ठरली. Accident Death Red-cross Signal

ट्विंकल जगदीश नगरे (२१,
ट्विंंकल जगदीश नगरे

भरधाव स्विफ्ट कारने दिलेल्या जबर धडकेत सिग्नलवर पायी जाणाऱ्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता रेडक्रॉस सिग्नल येथे घडली होती. ट्विंकल जगदीश नगरे (२१, सध्या रा.उत्तमरनगर, सिडको, मूळ रा. धुळे) असे मृत युवतीचे नाव आहे.

अपघातानंतर कारचालकाने उपचारासाठी युवतीस रुग्णालयात दाखल केले आणि तो पळून गेला. याप्रकरणी सुनील बापूराव जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आहे. Accident Death Red-cross Signal

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.