sanitizer seized अप्रमाणित सॅनिटायझरचा सुमारे 8 लाखाचा साठा जप्त

दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका वेअर हाऊस मधील कंपनीत अवैध व अप्रमाणित सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त करत कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.sanitizer seized

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जवळके दिंडोरी शिवारातील नवीन संचेती वेअर हाऊस मधील मारुती इंटेस्टीज कंपनीत दिंडोरी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा छापा मारला असता तेथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेकायदा सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा आढळून आला. त्यात पॅटसन सॅनिटायझरच्या 100 मिलीच्या सुमारे 5760 बाटल्या त्यात 3360 बाटल्यांवर बॅच उत्पादन तारीख एक्सपायरी तारीख किंमत असे काहीही आढळले नाही. तसेच 200 लिटरच्या दोन टाकीत सॅनिटायझर रसायन आढळून आले याबाबत दिंडोरीचे पुरवठा अधिकारी रवींद्र निरभुवणे यांनी फिर्याद दिली.  सदर बेकायदा सॅनिटायझर प्रकरणी अमित अलिम चंदांनी नाशिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत 7 लाख 92 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहेsanitizer seized

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.