गर्भपात रॅकेट : अनेक डॉक्टरांवर होणार कारवाई तर लवकरच गुन्हा दाखल होणार

नाशिक सह पूर्ण राज्याला  हादरवून सोडलेल्या  शासकीय रुग्णालयाचा वापर करत स्त्री भ्रूणहत्या प्रकरणी सरकार कठोर पाऊले उचलत असून या करिता राज्य आरोग्य सहसंचालक दाखल झाले आहेत. तर या प्रकरणाचा अहवाला सरकारला सादर करत याबाबत लवकरच सर्व दोषी डॉक्टर आणि कर्मचारी विरोधात गुन्हा नोद्वाला जाणार आहे. तर या व्यतरिक्त सरकारी नोकरीत असून खाजगी व्यवसाय आणि इतर ठिकाणी प्रॅक्टिस करत असलेल्या डॉक्टरांचा वेगळा अहवाल तयार करत कारवाई केली जाणार आहे.

राज्य आरोग्य सहसंचालक त्यांनी रुग्णालयातले अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी सुरु केली आहे. प्रथमदर्शनी डॉ. वर्षा लहाडे या दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई   होणार हे निश्चित झाले आहे.तर इतर चौकशी सुरु  आहे. दोन वर्षांपासून कुठलीही परवानगी न घेता खासगी दवाखाना थाटून सोनोग्राफी करण्यात येत होती. या प्रकरणाचा अहवाल आरोग्यमंत्र्याकडे देण्यात येणार आहे. या धाडसत्रामुळं भ्रुण हत्या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी रुग्णालायत स्त्री भ्रुण हत्या होत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

तर शासकीय सेवेत असून इतर ठिकाणी काम करत असलेल्या आणि खाजगी इतरांच्या नावे हॉस्पिटल सुरु केलेल्या डॉक्टरांवर अहवाल तयार केला जात असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर चौकशी समिती लवकरच आपला अहवाला सादर करणार असून या प्रकरणात अजून काय आणि कोण दोषी ठरतय हे पाहत कारवाई केली जाणार आहे असे जिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले आहे. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.