पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात आषाढी एकादशी; धर्मशक्तीतून राष्ट्रभक्तीचे धडे

पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात आषाढी एकादशी आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली. aashadhi ekadashi celebrated Pushpavati Rungta Girls Highschool Dindi Abhinav Bharat

पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात शनिवारी (दि. २१) दिंडी काढण्यात आली. विद्यार्थिनींनी संतांच्या वेगवेगळ्या वेशभूषा केल्या. विठूनामाचा गजर पर्यावरणाचा संदेश व राष्ट्रभक्तीचा गजर करत दिंडी अभिनव भारत मंदिरात दाखल झाली.

सावरकरांनी स्थापन केलेल्या तुळशीवृंदावनाची पूजा संतांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींनी व शाळेचे पदाधिकारी यांनी केली. यानंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जोगेश्वर नांदुरकर यांनी अभिनव भारतचे कार्य व वाड्याविषयी महत्व सांगतांना विद्यार्थिनी भारावून गेल्या. धर्मभक्ती व राष्ट्रभक्ती एकच आहे याचा प्रत्यय यावेळी विद्यार्थिनींना आला. aashadhi ekadashi celebrated Pushpavati Rungta Girls Highschool Dindi Abhinav Bharat

धर्मभक्ती व राष्ट्रभक्ती यांची परस्परांची सांगड घालत देश हा ‘देव असे माझा’ हे विद्यार्थिनींना पटवून दिले. राष्ट्रभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी दिंडी सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका जोत्सना आव्हाड, पर्यवेक्षिका स्मिता पाठक, प्रीती कोठावदे, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

aashadhi ekadashi celebrated Pushpavati Rungta Girls Highschool Dindi Abhinav Bharat
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.