मानधनवाढीसाठी आशाकर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

आशा कर्मचाऱ्यांनी  मानधनवाढीसाठी सुरू केलेल्या आदोलनात गोल्फ क्लब मैदान परिसरात जेलभरो आंदोलन केले होते,  मात्र आंदोलक महिलांची संख्या जास्त असल्याने व पोलिसांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणाच नसल्याने पोलिसांच्या चार वाहनांच्या ३२ फेऱ्या करत  आंदोलन करणाºयां महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते, या सर्व प्रकारामुळे मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी देखील झाली होती. दोन तास महामार्ग बसस्थानकावर आंदोलक महिलां  बसवून ठेवल्यानंतर सर्व आशा कर्मचाºयांना सोडून देण्यात आले आहे.  

राज्यात आशा व गटप्रवर्तकांचे मंगळवार (दि. ३) पासून आंदोलन सुरू झाले आहे.  तर राज्यातील ७५ हजार आशा, १३ हजार गटप्रवर्तकांनी संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.  आशा कर्मचाºयांना शासनाने मानधन तिप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करावी सोबतच  आशा व गटप्रवर्तकांना शासन सेवेत कायम करावे, तोपर्यंत अंगणवाडी सेविकांइतके मानधन द्यावे या मागण्यांसाठी हे आशा कर्मचाºयांचे आंदोलन सुरू आहे 

या अगोदर  आशा कर्मचाऱ्यांनी गोल्फ क्लब मैदानाबाहेर दिवसभर ठिय्या देऊन थाळीनाद आंदोलन केले होते.  तर आज सोमवारी सुमारे १३४२ आशा कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोनलन केले आहे. या आंदोलनासाठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या आशा कर्मचाऱ्यांना पावसातच आंदोलन करावे लागले आहे. नंतर ४ वाहनांतून ३२ फेऱ्या करून मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक परिसरातील मैदानावर थांबविण्यात आले होते.  

 दोन तासांनंतर आंदोलन करणाºया महिलांची नोंद करून त्यांना सोडून देण्यात आले. आशा कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात यवतमाळ येथील आशा कर्मचारी यांच्या विरोधातील लाठी हल्ल्याच्या विरोधात निषेधार्थ निवेदनही दिले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.