अखिल भारतीय किसान सभा शेतक-यांचा नाशिक ते मुंबई भव्य लॉंग मार्च (संपूर्ण वेळापत्रक)

विधान भवनाला बेमुदत महाघेराव

शेतक-यांचे ज्वलंत प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेने अभूतपूर्व लढ्याची घोषणा केली आहे. शेतक-यांच्या या अभूतपूर्व लढ्याच्या अंतर्गत किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा भव्य लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. राज्यभरातून या लॉंग मार्च मध्ये सामील झालेले  शेतकरी नाशिक येथून मुंबई विधानसभेपर्यंत पायी चालत येणार आहेत. दिनांक ६ मार्च २०१८ रोजी नाशिक येथून निघालेला हा लॉंग मार्च दिनांक १२ मार्च २०१८ रोजी मुंबई येथे पोहचल्यावर येथील विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहे.

शेतक-यांच्या लॉंग मार्चची रूपरेषा

  • ६ मार्च

नाशिक सी.बी.एस. चौकात शेतकरी दुपारी १.०० वाजेपर्यंत जमतील.

दुपारी १.०० ते ३.०० लॉंग मार्च व महाघेरावच्या लढ्याचे नियोजन स्पष्ट केले जाईल.

दुपारी ३.०० वाजता नाशिक येथील सी.बी.एस. चौकातून शेतक-यांचा लॉंग मार्च मुंबईकडे कूच करेल.

रात्रीचा मुक्काम रायगडनगर जवळ  वालदेवी नदीच्या काठावर होईल.

  • ७ मार्च

दुपारचे भोजन खंबाळे, ता. इगतपुरी जवळ

रात्री मुक्काम घाटणदेवी, ता. इगतपुरी

  • ८ मार्च

दुपारचे भोजन साई धाम, साई ढाब्या जवळ, कसारा, ता. शहापूर

रात्री मुक्काम कळंबगाव, ता. शहापूर

  • ९ मार्च

दुपारचे जेवण आसनगाव, ता. शहापूर

रात्री मुक्काम भातसा नदीवर

  • १० मार्च

दुपारचे भोजन भिनार ता. भिवंडी

रात्री मुक्काम मुंबई ढाबा, ता. ठाणे

  • ११ मार्च

दुपारचे भोजन विक्रोळी / घाटकोपर

रात्री मुक्काम सायन/दादर जवळ

  • १२ मार्च

सायन/दादरहून विधान भवनाकडे कूच

डॉ. अशोक ढवळे   (अखिल भारतीय अध्यक्ष, किसान सभा) ९८६९४०१५६५

आ.जे.पी.गावित   (माजी राज्य अध्यक्ष, किसान सभा)    ९४२२७५२३७७

किसन गुजर     (राज्य अध्यक्ष, किसान सभा)   ९४२०००१९४८

अर्जुन आडे राज्य कार्याध्यक्ष, (किसान सभा )    ९४२१८४९८८८

डॉ. अजित नवले     (राज्य सरचिटणीस, किसान सभा) ९८२२९९४८९१

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *