कांद्याची तेजी सुरूच, शेतकरी राजाला फायदा, सर्व साधारण बाजारात दर वाढणार नाही

कांद्याची तेजी सुरूच, शेतकरी राजाला होतोय फायदा

सर्व साधारण बाजारात  कांद्याच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही  

नाशिक : राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा तेजीत असल्याचे दिसून येतो आहे. त्याचा परिणाम म्हणून आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कांदा भाव वाढ कायम असून लासलगाव येथे १५ हजार क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये जवळपास १०० रु इतकी वाढ दिसून आली असून कमीत कमी ५०० रु. जास्तीत जास्त १३२१ रु. तर सर्व साधारण ११७५ रु भाव लासलगाव येथे मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे.Aajcha kanda bhav onion rates good farmer happy 

मात्र या भाव वाढीमुळे कोणत्याही प्रकारे खुल्या बाजारपेठेत कांदा भाव वाढणार नाही असे तज्ञ सांगत असून, सोशल मिडीयावर फिरत असलेल्या कांदा दर बाबत विश्वास ठेवू नये असे आव्हान बाजार समिती करत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीच्या लासलगाव येथे  पहिल्याच दिवशी सोमवारी सरासरी ९२० रुपये इतका होता. तर मंगळवारी सोमवारच्या भावाच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढ दिसून आली होती. सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल, तर कमाल दरात १३०० रुपयांच्या आसपास पोहचला होता. त्यामुळे सध्या कांदा तेजीत असून,त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ होणार आहे.

मात्र तरीही कारण नसतांना माध्यमांत ओरड झाली की सरकार विनाकारण भाव पाडण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे मोठा फटका शेतकरी वर्गाला bसतो. तर दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा विक्रीस आणला जात असल्याने थोडे पैसे मिळावे इतकी अपेक्षा शेतकरी वर्गाची असते. त्यामुळे दर वाढले तरी शासनाने हस्तक्षेप करू नये, अशीच अपेक्षा बळीराजा करीत आहे.

बाजार समिती : लासलगाव दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
21/06/2018
कांदा उन्हाळी क्विंटल 15000 500 1321 1175
बाजार समिती : लासलगाव – निफाड दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
21/06/2018
मका —- क्विंटल 18 1300 1360 1341
कांदा उन्हाळी क्विंटल 6680 551 1300 1151
गहू २१८९ क्विंटल 19 1824 1865 1841
बाजार समिती : लासलगाव – विंचूर दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
21/06/2018
कांदा उन्हाळी क्विंटल 4000 400 1200 1000

आमच्या सोबत जाहिरात करा लाखो शेतकरी मित्रांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवा !

—————————————————————————————————————————————-

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत.  आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.  aajcha kanda bhaav onion rates today 21 june 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. !

Whats App Group  https://chat.whatsapp.com/5VjMm2ecgVjLmxgY5eyo4i

पाहिजेत : प्रतिनिधी/ वार्ताहर डिजिटल मिडिया सोबत काम करा !

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

Aajcha kanda bhav onion rates good farmer happy

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.