कांद्यावर शेतकरी संतप्त :मग शेतकऱ्याची बायको नसते का गृहिणी ?

पावणेदोन वर्षानंतर शेतकऱ्याच्या कांद्याला समाधानकारक भाव भेटला तर गृहिणींच बजेट बिघडल्याच्या, बातम्यांना पेव फुटल.


मग शेतकऱ्याची बायको नसते का गृहिणी ??
जेव्हा कांद्याला ५० पैसे/किलो चा भाव भेटत होता तेव्हा शेतकऱ्याच घरच बजेट नसेल का बिघडल ?

का शेतकऱ्याने आयुष्यभर दुसऱ्यांसाठीच मरायच का ?
ज्याला नसेल परवड त खाऊ नका कांदा.

शेतकरी संजय साठे

आधी नीट समजून घ्या ..
आजही शेतकऱ्याला सरासरी २५ रु./किलो च्या आसपासच भाव मिळतोय कांद्याला ..
उगच शेतकऱ्याच्या नावाने रडण्यापेक्षा
किरकोळ बाजारात तुम्हाला ६० रु./किलो का मिळतो याचा कृपया तुम्ही शोध घ्या .
आणि हजारात एखाद्या शेतकऱ्याचा कांद्याचा लिलाव चांगला होतो बाकीच्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा लिलाव हा त्या त्या पेक्षा कमीच भावाने होतो..
पण एका शेतकऱ्याला मिळालेल्या चांगल्या भावच भांडवल करून “कांद्याला मिळाला एवढा भाव” असा लोकांचा भ्रम करन कृपया बंद करा ..

ज्यांना शेतीतल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी.
शेतकऱ्याच्या कांद्याला त्या कांद्याच्या साईज नुसारच भाव मिळतो..
शेतात पिकलेल्या सगळ्या कांद्याला सरसकट एकच भाव नसतो..
कांदा एकच पण साईज वेगवगळी ..
आणि त्यानुसार भाव..

त्यामुळे कृपया
जर शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे पैसे दोन पैसे मिळत असतील तर ते आनंदाने त्याच्या पदरात पडू द्या …आमच्या हि बजेटचा विचार करा…

संजय साठे नैताळे.निफाड नाशिक.

(Nashikonweb ने शेतकऱ्यांची व्यथा त्यांचाच शब्दात मांडली आहे.)

बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा पुढील लिंक क्लिक करा :

https://chat.whatsapp.com/J7nPIvca81092LcZKiyvLy

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.