आयुक्त मुंढेनी ५ कामचुकार अधिकाऱ्यांना केले निलांबित

नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामचुकारपणा करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांना निलांबित केले आहे. यामध्ये घरपट्टीची वसुली करण्यात दिरंगाई केल्यामुळे २ जणांना तर आरोग्य विभागात व्यवस्थित काम न करणाऱ्या ३ जणांना आयुक्तांनी घरचा रास्ता दाखवला आहे. Aaayukt Tukaram mundhe suspended five nmc workers

यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतानाच मुंढे यांनी कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता.

या कारवाईमुळे आयुक्तांचे कौतुक होत असले तरी महापालिकेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. नविन नौकर भरती पालिकेत गेल्या काही महिन्यांपासून केली गेली नाही.

त्यामुळे अशी कारवाई करताना विचार करावा अशी मागणीही करण्यात येत आहे. मात्र सदरच्या कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Aaayukt Tukaram mundhe suspended five nmc workers

******************

Like Our Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.