तपोवनात 34 लाख रुपये किमतीचा 700 किलो गांजा जप्त, दोघांना अटक

नाशिक : शहरात अवैध धंद्यांवर कारवाई चालू असतानाच तपोवन परिसरात अवैध गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना नाशिक पोलिसांनी 34 लाख रुपये किमतीच्या तब्बल सातशे किलो गांजा सह अटक केली आहे. तपोवन परिसरात आयशर गाडीमध्ये भाजीपाल्याच्या क्रेट्सच्या आडून हा गांजा आणण्यात आला होता. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 1 यांनी ही कारवाई केली आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 700 kilo ganja seized tapovan panchavati nashik police arrests two

यावेळी वाहनातील दोन संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. नितीन अशोक शिंदे पस्तीस राहणार मसूर म्हसरूळ आणि सुनील नामदेव शिंदे वय 47 राहणार मिरचीचे पालखेड तालुका निफाड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 680 किलो गांजा आणि (MH 12 EQ 1429 या क्रमांकाची आयशर ट्रक असा एकूण 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

700 kilo ganja seized tapovan panchavati nashik police arrests two
पोलीस कारवाई चालू असताना बघ्यांनी अशी गर्दी केली होती.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई चालू आहे. त्याच अनुषंगाने कारवाई चालू असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपोवन परिसरात एका आयशर ट्रक मध्ये 1200 किलो गांजा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, युनिट 1चे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, गुन्हे शोध पथकाचे प्रवीण कोकाटे, वसंत पांडव आदींसह कर्मचाऱ्यांनी तपोवन येथील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात सापळा रचला. 700 kilo ganja seized tapovan panchavati nashik police arrests two

गुन्हे शोध पथकाने हे वाहन दिसताच थांबवून वाहनाची तपासणी सुरू केली. भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेटच्या मागे गोण्यांमध्ये भरून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला। यावेळी घटनास्थळी वजन काटा आणून गांजाचे वजन केले असता तो 680 किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

हा गांजा साधू महंतांच्या साठी??

तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणावर साधू महंत राहतात. हे साधू महंत गांजा घेत असल्याचे नेहमी बोलले जाते. हा गांजा त्या साधू महंतांसाठीच आणला गेल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे या प्रकरणात त्यांची पोलिस चौकशी करणार का याकडे नाशिककरांचे लक्ष असेल.

याआधी नाशिक शहरात मालेगाव स्टँड आणि भद्रकाली परिसरात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा पकडण्यात आला होता. मात्र यामध्ये मुख्य सूत्रधार सोडून केवळा संशयितांवर कारवाई झाल्याने चरस, भांग, गांजा आदी अमली पदार्थांची विक्री मात्र जोरात सुरूच होती.

500 किलो गांजा गेला कुठे?

दरम्यान या प्रकरणात पकडण्यात आलेला आयशर गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आल्याचा संशय पोदिसांनी व्यक्त केला असून मिळालेल्या माहितीनुसार 1200 किलो गांजा मिळून यायला हवा होता. मात्र या गाडीत केवळ 680 किलो माल मिळून आला आहे. त्यामुळे उर्वरित 520 किलो गांजा कुठे विक्री करण्यात आला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

700 kilo ganja seized tapovan panchavati nashik police arrests two
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.