नाशिक : पश्चिम विभागीय राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेला उत्साहात सुरुवात

नाशिक २८:०८:२०१७ :- नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन आणि के. एन. डी. मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या सिडको येथील महेश भवन कार्यालयात ५व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

या स्पर्धेचे उदघाटन नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक नानासाहेब महाले यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक केशवअण्णा पाटील,  भारतीय जम्प रोप फेडरेशनचे खजिनदार अब्रार अहमद, माजी नगरसेवक दत्ता पाटीलमहाराष्ट्र जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मारवाडी, सरचिटणीस अशोक दुधारे, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना नानासाहेब महाले यांनी सांगितले की, जम्प रोप म्हणजेच दोरीच्या उड्या हा खेळ प्रकार सर्व खेळाडूसाठी फार उपयोगाचा आहे. यावेळी केशवअण्णा पाटील यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोक दुधारे यांनी केले तर सूत्रसंचालन विक्रम दुधारे यांनी केले. या स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, गुजराथ. दीव दमण गोवा आदी राज्यांच्या संघानी सहभाग घेतला आहे.

यामध्ये १२ वर्षाआतील मुलांच्या गटात ३० सेकंद स्पीड या प्रकारात महाराष्ट्राच्या सामंत पवारने सुवर्ण पदक पटकावले,  मध्य प्रदेशच्या परम श्रीवास्तवने रजत पदक मिळविले. तर महाराष्ट्राच्या निशांत पगारेने कास्य पदक मिळविले. १४ वर्षाआतील मुलांच्या गटात याच ३० सेकंद स्पीड या प्रकारात मध्य प्रदेशच्या अनुज कपाडियाने सुवर्ण, महाराष्ट्राच्या अंकुर जाधवने रजत तर मध्य प्रदेशच्या वैष्णव धनकने कास्य पदक मिळविले.  उद्या दिवसभर विविध प्रकारच्या स्पर्धा होणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन सचिव नितीन हिंगमिरे यांनी दिली.

आजच्या स्पर्धेचा निकाल:-

अ)  १२ वर्षे मुले : ३० सेकंद स्पीड :- १) सामंत पवार (महाराष्ट्र) २) परम श्रीवास्तव (एम. पी) ३) निशांत पगारे (महाराष्ट्र)        ब)  १४ वर्षे मुले : ३० सेकंद स्पीड :- १) अनुज कपाडिया (एम. पी) २) अंकुश जाधव  (महाराष्ट्र)  ३) वैष्णव धनक  (एम. पी )

क) १६ वर्षे मुली : ३० सेकद स्पीड :- अ) पठाण अरिबा  (गुजराथ ) ब) सुरभी शर्मा  (एम. पी) ३) दिशा पटेल  (गुजराथ)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.