vaccinated in Nashik नाशिक विभागात 48 लाख 43 हजार 943 नागरिकांचे झाले लसीकरण

कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 50 लाख 32 हजार 320 डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी एकूण 48 लाख 43 हजार 943 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.vaccinated in Nashik

नाशिक जिल्ह्यात एकूण 16 लाख 42 हजार 452 नागरिकांचे लसीकरण

नाशिक जिल्ह्याला एकूण 17 लाख 54 हजार 20 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 16 लाख 42 हजार 452 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 69 हजार 113 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 40 हजार 920 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 1 लाख 27 हजार 606 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 54 हजार 535 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 2 लाख 69 हजार 881 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 31 हजार 948 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 7 लाख 66 हजार 305 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 2 लाख 82 हजार 144 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 11 लाख 80 हजार 59 नागरिकांचे लसीकरण

अहमदनगर जिल्ह्याला एकूण 12 लाख 39 हजार 250 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 11 लाख 80 हजार 59 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 44 हजार 806 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 33 हजार 430 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 58 हजार 554 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 23 हजार 407 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 77 हजार 451 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 27 हजार 901 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 5 लाख 75 हजार 558 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 लाख 38 हजार 952 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात एकूण 6 लाख 17 हजार 209 नागरिकांचे लसीकरण

धुळे जिल्ह्याला एकूण 6 लाख 27 हजार 40 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 6 लाख 17 हजार 209 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 16 हजार 950 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 10 हजार 480 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 31 हजार 731 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 11 हजार 119 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 59 हजार 255 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 18 हजार 303 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 2 लाख 68 हजार 751 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 620 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जळगांव जिल्ह्यात एकूण 9 लाख 21 हजार 961 नागरिकांचे लसीकरण

जळगांव जिल्ह्याला एकूण 9 लाख 26 हजार 860 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 9 लाख 21 हजार 961 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 30 हजार 214 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 20 हजार 218 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 63 हजार 523 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 25 हजार 320 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 65 हजार 31 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 17 हजार 51 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 4 लाख 50 हजार 528 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 50 हजार 76 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 4 लाख 82 हजार 262 जणांचे लसीकरण

नंदुरबार जिल्ह्याला एकूण 4 लाख 85 हजार 150 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 4 लाख 82 हजार 262 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 14 हजार 897 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 9 हजार 592 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम…vaccinated in Nashik

 

दिनांक: 30 जुलै 2021 नाशिक

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 67

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 71

नाशिक मनपा- 26
नाशिक ग्रामीण- 39
मालेगाव मनपा- 02
जिल्हा बाह्य- 04

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8509

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 03
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.