दुर्दैवी : नवसाचा ४ वर्षाचा मुलगा, तिसऱ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू

नाशिक : अशोका मार्ग खोडे नगर परिसारत दुर्दैवी घटना घडली आहे. नवस करून जन्मलेला ४ वरशील मुलगा इमारतीचा बाल्कनीत खेळत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून अपघातात मृत झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, अशोका मार्ग येथील jmct कॉलेज च्या मागील परिसारत  एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर  हलनेस मोईन सय्यद हा आपल्या बहिणी बरोबर खेळत होता,  मात्र तो खेळत असताना त्याचा तोल गेला आणि बाल्कनीतून तो खाली पडला, ही घटना समोर येताच त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्यात आई वडिल व दोन बहिणी असा परिवार आहे. मुलगा जन्मावा म्हणून त्यांच्या घरातील लोकांनी नवस केला होता.त्याच्या वडिलांचे मेनरोड भागात मोबाईल विक्री आणि दुरूस्तीचे दुकान आहे.याप्रकरणी मुंबईनाका पोलिसात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास हवालदार क्षिरसागर करीत आहेत.

आम्हाला तुम्ही लाईक करा फेसबुक : https://www.facebook.com/NashikOnWeb/

आम्हाला ट्वीटर वर फॉलो करा : https://twitter.com/nashikonweb?lang=en

तुम्हाला नाशिकच्या सर्व बातम्या मोबाईलवर लवकर कळतील.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.