राज्य बॅडमिंटन : नाशिकच्या प्रज्वल सोनवणेचे तिहेरी यश

द्वितीय राज्य सब ज्युनिअर बॅडमिंटन निवडचाचणी स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, ठाणेच्या खेळाडूंना यश

2nd Sub Junior Badminton State Selection Championship 2018 Nashik Final

नाशिक : नाशिकमधील विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेल्या द्वितीय राज्य सब ज्युनिअर बॅडमिंटन निवडचाचणी स्पर्धेत नाशिककर प्रज्वल सोनवणे थक्क करणारे यश मिळवले असून त्याने 13 वर्षाखालील  एकेरी आणि दुहेरी तसेच 15 वर्षाखालील एकेरी अशा तीन गटात विजेतेपद मिळवले आहे. मुलुंड येथे झालेल्या पहिल्या निवडचाचणी स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावलेल्या प्रज्वलची नाशिकमध्ये घरच्या मैदानावर खेळताना सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. 13 वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत मात्र नाशिकच्या श्रावणी वाळेकर आणि वरदा एकांडे जोडीलाचांगली लढत देऊनही अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 2nd Sub Junior Badminton State Selection Championship 2018 Nashik Final

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे 16 ते 20 जुलै दरम्यान आयोजित या स्पर्धेतील अंतिम सामने शुक्रवार (दि.20) रंगले. सर्व विजेत्यांना अंतरराष्ट्रीय खेळाडू तथा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप गंधे, बांधकाम व्यावसायिक विक्रांत मते यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा बॅडमिंटनसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

13 वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या गटात प्रज्वल सोनवणे याने दुहेरीतील त्याचा साथीदार ओम गावंडी याचा 21-11, 21-11 असा पराभव करत विजेतपद मिळवले. तर 13 वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पहिल्या मानांकित मुंबई उपनगरीयच्या अलिशा नाईकने पुण्याच्या सानिका पाटणकरचा 18-21, 21-13, 21-18 पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. पहिला सेट जिंकल्यानंतर लयीत असलेल्या सानिकाला अलीशाने सर्वच आघाड्यांवर चकवा देत दुसरा सेट आरामात जिंकत तिसऱ्या सेट मध्ये खेळ उंचावून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 2nd Sub Junior Badminton State Selection Championship 2018 Nashik Final

13 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत ओम गावंडीसह खेळताना प्रज्वलने शर्मन घुबे आणि वेदांत नातू या जोडीचे आव्हान 21-11, 21-12 असे परतवून लावत विजेतेपद मिळवले. तर मुलींच्या गटात श्रावणी वाळेकर-वरदा एकांडे या नाशिककर जोडीचा मुंबईची अलिशा नाईक आणि ठाण्याच्या मधुमिता नारायण या जोडीने 21-17, 19-21, 21-8 असा पराभव केला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही जोड्यांनी अत्यंत चिवट खेळ करत जिंकण्याच्या दिशेने आगेकूच करत होत्या. मात्र तिसऱ्या सेटमध्ये श्रावणी-वरदाचा खेळ ढेपाळल्याचा फायदा घेत वेळीच आक्रमक होताना मोठी आघाडी घेत विजेतेपदाला गवसणी घातली.

15 वर्षाखाली मुलांच्या एकेरीच्या गटातही अंतिम फेरीत नाशिककर प्रज्वलला सांगलीच्या तेजस शिंदेला पराभूत करण्यास जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. पहिला सेट 21-17 असा जिंकल्यानंतर दुसरा सेटसह (21-17) सामना जिंकत स्पर्धेतील तिसरे विजेतेपद पटकावले.तर मुलींच्या गटात प्रथम मानांकित रिया हब्बूला पुण्याच्याच ऋचा सावंतने 21-15, 12-21, 21-20 असा पराभव केरात अंतिमसामना जिंकला. अत्यंत अटीतटीचा झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी घेताना पहिला सेट जिंकत सानिकाने आपले इरादे स्पष्ट केले. मात्र दुसऱ्या सेट मध्ये रियाने आपला अनुभव पणाला लावत सेट 21-12 अशा मोठ्या फरकाने जिंकला. मात्र सानिकानेने आक्रमक होत आव्हान कायम ठेवले. अखेरचा सेट गेम पॉईट पर्यंत खेचला गेला. अखेल सानिकाने बाजी मारत विजेतेपद मिळवले.

10 वर्षाखालील गटात मुलींमध्ये रिया विन्हेकर (बृहन्मुंबई) आणि तर मुलांमध्ये अवधूत कदम (पुणे) यांनी विजेतेपद मिळवले. 2nd Sub Junior Badminton State Selection Championship 2018 Nashik Final

15 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत पुणेचा प्रथम वाणी आणि सांगलीचा तेजस शिंदे या जोडीला पुण्याच्या आर्य आणि ध्रुव ठाकोरे या जोडीने 21-16, 21-7 असे पराभूत करत गटाचे विजेतेपद मिळवले.तर मुलींच्या दुहेरीच्या गटात प्रथम मानांकित रिया हब्बू-ऋचा सावंत (पुणे) जोडीने आणि  अदिती साधणकर-निकिता जोसेफ या जोडीचा 21-15, 21-18 असा पराभव करत विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील अंतिम सामन्यांचे निकाल :

१० वर्षाखालील

मुले : अवधूत कदम (पुणे) वि. वि. सोनिश सिंग (ठाणे) 21-9 21-10

मुली : रिया विन्हेरकर (बृहन्मुंबई) वि. वि. जुई जाधव (पुणे) 21-15, 21-15

१३ वर्षाखालील

एकेरी

मुले : प्रज्वल सोनवणे (नाशिक) वि. वि. ओम गावंडी (ठाणे) 21-11, 21-11

मुली : अलिशा नाईक (मुंबई उपनगर) वि. वि. सानिका पाटणकर (पुणे) 18-21, 21-13, 21-18

दुहेरी

मुले : ओम गावंडी (ठाणे) – प्रज्वल सोनवणे (नाशिक) वि. वि. शर्मन घुबे- वेदांत नातू (पुणे) 21-11, 21-12

मुली : अलिशा नाईक (मुंबई) – मधुमिता नारायण वि. वि. श्रावणी वाळेकर- वरदा एकांडे (नाशिक) 21-17, 19-21, 21-8

१५ वर्षाखालील

एकेरी

मुले : प्रज्वल सोनवणे (नाशिक) वि. वि. तेजस शिंदे (सांगली) 21-17, 21-17

मुली : ऋचा सावंत (पुणे) वि. वि. रिया हब्बू (पुणे) 21-15, 12-21, 22-20

दुहेरी

मुले : आर्य ठाकोरे – ध्रुव ठाकोरे (पुणे) वि. वि. प्रथम वाणी (पुणे) – तेजस शिंदे (सांगली) 21-16, 21-7

मुली : ऋचा सावंत – रिया हब्बू (पुणे) वि. वि. अदिती साधणकर – निकिता जोसेफ (नागपूर) 21-15, 21-18

2nd Sub Junior Badminton State Selection Championship 2018 Nashik Final
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.