मुंढेंचा स्वभाव आवडला नाही की काम? नाशिककर २९ला पुन्हा रस्त्यावर

मुंढेंचा स्वभाव चुकीची कामे करणाऱ्यांना आवडला नाही, यात नाशिककरांचा दोष काय? भ्रष्ट लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कडक व शिस्तप्रिय स्वभावाला हेतुपुरस्कर बदनाम केले. कार्यक्षम प्रशासक राज्यात लोकप्रिय असलेला अशिकारी नेमका नाशिकमध्ये का संपवला जातोय? यात वीस लाख नागरिकांच्या हिताचा बळी गेला त्याचे काय? असे अनेक प्रश्न विचारत आम्ही नाशिककरने पुन्हा एकदा मुंढे यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 29 November Morcha support Nashik Wants Mundhe again

Nashik News On Web Latest Updates Marathi Batmya 29 November Morcha support Nashik Wants Mundhe again तुकाराम मुंढे नाशिक आम्ही नाशिककर

सोमवारी (दि. 26) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे झालेल्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला आहे. मुंढे परत नाशिक महापालिका आयुक्तपदी परतू शकतात अशी शक्यता असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिव पदी नियुक्ती झाली असली तरी मुंढे यांनी अजूनही या पदाचा कार्यभार स्वीकारला नाही. अशातच ही मुंढे यांची बदली रद्द होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. म्हणून २९ नोव्हेंबरला निघणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्ह असे आवाहन आम्ही नाशिककर च्या सदस्यांनी केले आहे. 29 November Morcha support Nashik Wants Mundhe again

बदली झाली त्यादिवशी म्हणजेच २२ नोव्हेंबरला नाशिककरांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र नोयोजन आणि कमी वेळ यामुळे हे आंदोलन कार्यकर्त्यांना अटक करून चिरडण्यात आले. एका बाजूला आंदोलन आणि एकाबाजूला रामायण बंगल्याच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांची आतिषबाजी यामुळे नाशिककरांच्या संतापात भर पडली. यावेळीही आम्ही नाशिककरांच्या तक्रारीवरून अज्ञातांच्या विरोधात गुन्हाही नोंदविण्यात आला.

मात्र आता तुकाराम मुंढे परत मिळण्याच्या शक्यता बघता २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. सावरकर जलतरण तलाव – त्र्यंबकेश्वर नाका – जिल्हा परिषद भवन – गंजमाळ सिग्नल मार्गे शालीमार – आंबेडकर पुतळा अशा मार्गावर हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. येवेली विविध फलक हातात घेऊन मोर्चेकरी सामील होतील.

#NashikWantsMundhe या हशटग सह सोशल मिडीयावर याचा प्रचार करण्यात येत असून या मोर्चात जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

29 November Morcha support Nashik Wants Mundhe again
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “मुंढेंचा स्वभाव आवडला नाही की काम? नाशिककर २९ला पुन्हा रस्त्यावर

  1. Changlya mansa chi kimaat nahi hya rajkarni lokana munde saheb tumhala amchya nashik karnacha selute ahe aaj hi amhi nashik kar mundhe saheb yanchya sobat ahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.