सोनई तिहेरी हत्याकांड : सहा आरोपींना फाशीची शिक्षा

सोनई तिहेरी हत्याकांड सहा आरोपींना फाशिचीची शिक्षा, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक – न्यायालय

माणुसकीला काळीमा फासलेल्या अहमदनगर येथील सोनई तिहेरी क्रूर हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागला असून न्यायालयाने ६ दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या बरोबर जाती व्यवस्थेवर जोरदार टीका केली असून या आरोपींना जगण्याचा अधिकार नाही त्यांना फाशीच दिली पाहिजे असे मत न्यायलयाने नोंदवले आहे. दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दोषींकडून हा दंड वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल. नाशिक सेशन कोर्टात न्यायाधीश आर.आर.वैष्णव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल  दिला आहे. या निकालावर मृतांच्या घरातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

2003 Sonai murders: Nashik court awards death sentence to six,More than five years after the gory murders of three Dalit youths in Ahmednagar’s Sonai village shook the State, the Sessions court in Nashik on Saturday pronounced the death sentence on the six persons convicted of the crime.

मृतकांचे नातेवाईक अश्रू अनावर

सवर्ण आणि मागासवर्गीय अर्थात आंतरजातीय  प्रेम प्रकरणातून सोनई येथे तीन सफाइ कर्मचारी तरुणांची सहा  जणांनी निर्घृण हत्या केली, या प्रकरणातील गेल्या दीड वर्षांपासून सुरक्षेच्या कारणाने नगर येथे केस न चालवता, नाशिक कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. या हत्याकांडातील राक्षसी क्रौर्याचे स्वरुप पाहता, सर्व आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी (ता.18) केली होती.

या हत्याकांडात न्यायालयाने रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा; अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कुºहे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा यांना सोमवारी दोषी ठरविले होते. तर अशोक रोहीदास फलके रा. लांडेवाडी,सोनई यास दोषमुक्त केले होते. यापैकी सहा आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहूल राजू कंडारे( २६) सर्व रा. त्रिमुर्ती कॉलेज, नेवासा फाटा या तीन तरूणांचा अतिशय निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी खून केला होता.

या खटल्याची अंतीम सुनावणी सोमवारी (15 जानेवारी) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे जाणून गुरूवार (18जानेवारी) रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. गुरूवारी सकाळी खटल्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकीलांना पुन्हा एकदा बाजू मांडण्याची संधी दिली होती. तेव्हा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडत हा किती भयानक प्रकार आहे सांगत त्यांना मृत्युदंड दिला पाहिजे असे नमूद केले होते.

या प्रकरणावर आज २० जानेवारी रोजी कोर्टाने अंतिम निकाल दिला. मानवतेला काळिमा फासणाऱ्यांना समाजात जगण्याचा अधिकार नाही. “तुमचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे” अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात ताशेरे ओढले आहेत. नंतर लगेच अंतिम निर्णय कोर्टाने दिला आहे.

काय होता युक्तिवाद :

आरोपींचे वकील न्यायलयात युक्तिवाद करतांना म्हणाले की न्यायलयाने या सर्वाना  कमीत कमी शिक्षा केली पाहिजे. कारण या  प्रत्यक्षदर्शी कोणताही  पुरावा  उपलब्ध नाही. त्यात ज्यांना आरोपी केले आहे त्यातील  मुलीच्या भावाचे वय कमी आहे. तर  मुलीच्या वडिलांनी साठी पार केली आहे ते तर  गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात आहेत त्यामुळे न्यायालयाने दया करावी आणि शिक्षा कमी करावी अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र सरकारी वकीलांनी आगोदर कठोर भूमिका घेतली होती. सर्व प्रकार कोर्टा समोर त्यांनी मांडला आणि  सर्वाना मृत्युदंडाचीच शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. यामध्ये सरकार पक्षा तर्फे  22 परिस्थितिजन्य पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध केले गेला हे सांगितले आहे. हे सर्व विचारपूर्वक केले असून  त्यामुळे कृत्याचे परिणाम ज्ञात होता. त्यामुळे वयाचा प्रश्न येत नाही.तर या प्रकरणात  घटनेनंतरही आरोपींना कोणताही पश्चात्ताप नाही. तर ज्यांना त्यांनी निघृत पणे मारले ते सर्व मृत नि:शस्त्र होते मृतानी त्यांनी उद्युक्त केले नाह. तेव्हा फाशीच हवी अशी मागणी केली होती.

काय आहेत परिस्थतीजन्य पुरावे Circumstantial evidence :

या प्रकरणात मुख्य मृतक असलेल्या सचिन सोहनलाल घारू (२६) याची हत्या केल्या नंतर सर्व पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये त्याचे दोन मित्र त्यावेळी तेथे होते ते प्रत्यक्ष दर्शी होते त्या संदीप राजू थनवार (२४) व राहूल राजू कंडारे( २६) दोघांना सुद्धा क्रूर पणे मारले गेले होते. तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे चौकशी सुपूर्द केली. साधारणत: एका महिन्यात तपास पूर्ण होऊन २५ मार्च २०१३ रोजी सीआयडीने आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात ९८२ पानांचे दोषारोपपत्र असून, ५३ साक्षिदारांचे जबाब नोंदवून त्यांची न्यायालयासमोर तपासणी झाली होती.

यामध्ये कोर्टासमोर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २२ असे परिस्थतीजन्य पुरावे सादर केले होते ज्यामुळे हे हत्याकांड कसे घडले ते सिद्ध झाले आहे. यातील प्रमुख मुद्दे असे की घटनेच्या अगोदर पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सचिनला आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. मयत सचिन धारू हा अनुसूचित जातीचा होता व तो त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कामाला होता व त्याच महाविद्यालयातील सवर्ण जातीच्या विद्यार्थिनीशी त्याचे प्रेम होते व दोघांनीही लग्न करण्याचा निश्चय केला होता. मयत सचिन धारू हा सवर्ण जातीच्या मुलीशी विवाह करणार आहे याची पुरेपूर खात्री आरोपींना झाली होती. त्यामुळे असे होऊ नये त्यासाठी त्यांनी कट रचला, अशोक नवगिरे याला त्यासाठी पुढे करून सचिनचा मित्र संदीप धनवार याला खोटे कारण दाखवून बोलवून घ्यायचे, संदीपबरोबर सचिन धारू हादेखील येईल हे सर्व आरोपींना ज्ञात होते. हत्याकांड करताना आरोपींचा राग इतका टोकाला होता की त्यांनी सचिनच्या हात व पायाचे ८ तुकडे केले व ते पाणी असलेल्या खोल विहिरीत टाकले तसेच त्याचे शीर कापून धड कोरड्या विहिरीत बुजून टाकले. सचिनचा मित्र राहुल याचाही निर्घृणपणे खून करताना त्याच्या डोक्यावर घाव घातले.आरोपींनी अतिशय नियोजनपर्ण कट केला. सचिन व राहुल यांचा कोणताही पुरावा ठेवला नाही.सचिनचा मित्र संदीप याला संडासात उलटे टांगून त्याला गुदमरून ठार मारले आहे. हे सर्व सी आय डी तपासात उघड झाले होते. तर दुसरीकडे सवर्ण जातीची मुलगी फितूर झाली असली तरी, ही घटना १ जानेवारी २०१३ रोजी घडली तोपर्यंत मुलगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कॉलेजमध्ये शिकत होती. परंतु घटनेनंतर तिने कॉलेजला जाणे बंद केले. याबाबत तिला तिच्या शिक्षकांनी विचारले असता, ‘तिने आमच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे’ असे सांगितले आहे.

माणुसकी पेक्षा जाती व्यवस्था किती विघातक आहे हे पुन्हा समोर आहे. या प्रकरणातील मुलगी सीमा ही फक्त एकदा न्यायालयात साक्ष दिली होत. मात्र त्या नंतर तिने पुन्हा एकदा तिची साक्ष फिरवली आणि फितूर झाली. तीचे प्रेम तर गेलेच मात्र तिचे वडील आणि भाऊ इतर नाते संबंधातील लोक या नीच कृत्यामुळे प्रकरणात गुंतले गेले  आहेत. त्यामुळे सर्व बाजूने तिचे मोठे नुकसान झाले आहे. ती सध्या कोठे आणि काय करते हे मात्र तिच्या घरातील इतर सदस्यांनी गुप्त ठेवले आहे. या हत्याकांडातील तिचा प्रियकर सचिन सोहनलाल घारू याच्या छातीवर तिचे नाव कोरले होते हे तपास अहवालात नमूद आहे.

काय आहे सोनई तिहेरी  हत्याकांड 

अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा ही नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एडचे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि सीमा यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र जेव्हा सीमाच्या घरी हे कळले तेव्हा मात्र प्रकरणाला वेगळाच रंग आला. यातील सीमाच्या घरातील लोकांनी या तिघांना मारण्याचा कट रचला होता.

सीमाचे वडील व गुन्ह्यातील संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण दरंदले (भाऊ), संदीप कुर्‍हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक फलके व अशोक नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील शौचालयाच्या सेफ्टी टँक दुरुस्तीचा खोटे कारण समोर केले होते. सोबत कामाची अधिक रक्कम देतो असे सांगून संदीप थनवार, सचिन घारू व तिलक राजू कंडारे यांना 1 जानेवारी 2013 रोजी बोलावले.

हीच वेळ त्यांनी साधली संशयितांनी अचानक हल्ला केला आणि संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून जागीच ठार करण्यात आले होते. हे सर्व पाहून पळून जाणार्‍या राहुल कंडारे याच्यावर कोयत्याने जबर  वार केले आणि ठार केले होते.  सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून खून करण्यात आला होता. हे सर्व पोलीस तपासात स्पष्ट झाले होते.

सुरक्षा कारणाने खटला नाशिकमध्ये

सोनई हत्याकांड : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रतिक्रिया देतांना, माध्यमे आणि nashikonweb प्रतिनिधी

हा खटला सुरु होता तेव्हा यामधील सर्व साक्षीदार यांच्यावर स्थानिक ठिकाणी दबाव येईल त्यामुळे हा खटला नगर मध्ये न चालवता नाशिक किंवा जळगाव येथे चालवावा अशी याचिका मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे करण्यात आली होते. घटनेचे गांभीर्य पाहता उच्च न्यायालयाने ती मान्य करत पूर्ण सुरक्षा द्या असे निर्देश देत हा खटला नाशिक जिल्हा न्यायालयात चालवायला परवानगी दिली होती.

प्रतिक्रिया :

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम :

जातीव्यवस्था एडस या रोगासारखी समाजात पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, अस मत मांडत न्यायाधिशांनी सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोबतच जातीचं चुकीच्या  पद्धतीने भांडवल करून समाजात उद्रेक करण्याचा काही विघातक प्रवृत्ती करीत असतात. जात आणि धर्माचा अहंकार बाळगणारे हे ठेकेदार लांडग्यासारखे मोकाट फिरू नयेत, यासाठी हा निकाल नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. हा निकाल जातीच्या ठेकेदारांमध्ये भीती निर्माण करणारा असून त्यामुळे नक्कीच बदल घडेल आणि असे गुन्हे घडणार नाहीत असे मत निकम यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केले आहे,

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.