नाशिककर आनंदाची बातमी : नमिता कोहक यांनी जिंकाली जागतिक सौदर्यस्पर्धा MRS.GLOBAL UNITED 2017 (Video)

नाशिकची कन्या असलेल्या नमिता कोहोक यांनी अभिमानस्पद कामगिरी केली आहे. त्यांनी समाजसेवेला वाहिलेल्या आणि पूर्ण जगात काम करत असलेल्या Global United या संस्थेच्या तर्फे आयोजित सौदर्य  स्पर्धेत MRS.GLOBAL UNITED 2017  हा किताब जिंकला आहे. अमेरीकेत झालेल्या स्पर्धेत   त्यांना गौरवण्यात आले   आहे. त्यामुळे  आपल्या नाशिकच महाराष्ट्र आणि देशाच नाव पुन्हा एकदा   उज्वल झाले आहे.ही स्पर्धा  Minnesota in Minneapolis at USA  अमेरिकेत पार पडली आहे. नमिता यांना सौंदर्यचा मुकुट   देवून त्यांचा गौरव   केला गेला आहे.

For Video Click Here :https://youtu.be/7muFvUs8054

पहिल्या भारतीय महिला ज्यांनी जिंकला हा किताब !

पहिल्या कॅन्सर सोबत झुंज देवून जिंकलेल्या महिला !

पूर्ण जगात आणि देशात करणार कॅन्सर रोगाविषयी जनजगृती आणि आर्थिक मदतीसाठी प्रयत्न !

 नमिता कोहोक यांची  प्रतिक्रिया 

“हे एक मोठे पद आणि सन्मान माझ्या साठी असेल,
स्वप्न …. प्रवास करत असताना मी “मिसेस ग्लोबल युनायटेड 2017″ हा किताब जिंकला आहे.
मला नेहमीच विश्वास होता की स्वप्ने सत्यात उतरतात …. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा,
विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे
आणि समर्पणाने मनःपूर्वक त्यांना पाठपुरावा करा.
मी अमेरिकेतील मिनियापोलिस
येथील मिनेसोटा येथील एमआरएस.एमआरएस.जीब्लॉटल संयुक्त 2017 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.
मला अभिमान वाटतोय, भाग्यवान आणि
मी पहिल भारतीय महिला आणि पहिली भारतीय कॅन्सर सर्व्हायव्हर म्हणून सन्मानित झाले आहे.
देव तुम्हाला मदत करण्यासाठी आणि आपले स्वप्न साकारण्यासाठी नक्की मदत करेल.
मी माझे स्वप्न माझे जीवन जगले आहे;अनेक शुभेच्छा”

काय आहे ही स्पर्धा : 

वेंडी लिंडबर्ग यांनी ग्लोबल युनायटेडची स्थापना केली आहे. हि संस्था  समाजातील इतर समाजसेवी संस्था सोबत मिळून काम करते. तर यामध्ये महिला स्वतः आपल्या कर्तुत्व आणि खरे सौदर्य काय आहे हे शोधून येथे काम करत आहेत. यामध्ये महिला शक्तीचा उपयोग करत सामाजिक सेवा केली जाते. तर याद्वारे जी स्पर्धा घेतली जाते त्या महिलांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी सामाजिक उपक्रमात भाग घेणे गरजेचे आहे. तर मुख्यतः या मधील विजेते असलेया महिला कॅन्सर या आजारासा सोबत निगडीत असे काम करत असतात. त्यामुळे या स्पर्धेत जी सौदर्यवती निवडली जाते तिच्या मुकुटामध्ये एक सुवर्ण त्रिकोण रिबीन असते ते चिन्ह म्हणजेच कॅन्सर सोबत  लढाईचे चिन्ह आहे.

कर्करोगाची लढाई महत्वाची आहे :

कर्करोग झाल्याचे निदान झालेल्या मुलाची सरासरी वय 6 असते , कर्करोगाचे निदान झालेले 80% मुले विकसनशील देशांमध्ये आहेत.
लहानपणीची कॅन्सर ही एक जागतिक समस्या आहे आणि एक संस्था केवळ हा प्रश्न सोडवू  शकत नाही.  संशोधनामुळे  हा प्रश्न काही   अंशी मिटला आहे. त्यामुळे जागृती करण्यासाठी या सौदर्यवती मदत करणार आहे. विशेष:  लहान मुलांतील कॅन्सर   होय.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.