wolf attack लांडगासदृश्य वन्यप्राण्याच्या टोळीचा हल्ला, १४ शेळ्या ठार, ८ जखमी

नाशिकमधील निफाड तालुक्यातील मौजे थेटाळे गावाच्या शिवारात एका वस्तीवर तारेच्या कुंपणामध्ये बंदीस्त असलेल्या शेळ्यांवर गुरुवारी मध्यरात्री लांडगासदृश्य वन्यप्राण्याच्या टोळीने हल्ला केला. यामध्ये १४ शेळ्यांची शिकार करत आठ शेळ्यांना जखमी करून पळ काढला आहे. 14 goats killed, 8 injured in wolf attack
या घटनेमध्ये थेटाळे येथील शाहु दगु शिंदे यांची गट क्रमांक ५७/२मध्ये शेती आहे. याठिकाणी त्यांच्या वस्तीवर राजाराम तुळशीराम शेवरे हे शेळी पालनाचा व्यवसाय करतात. शेवरे यांच्या मालकीच्या शेळ्या येथील भुखंडावर एका तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त करुन नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी ठेवण्यात आल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास लांडगासदृश्य वन्यप्राण्यांच्या टोळीने सामुहिकरित्या हल्ला चढवुन शेळ्यांची शिकार केली. यावेळी या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १४ शेळ्यांना आपला जीव गमवावा लागला तर ८ शेळ्या जखमी झाल्या आहेत. यावेळी वनरक्षकांनी मृतावस्थेतील शेळ्यांच्या जखमांची पाहणी करत पंचनामा केला.wolf attack
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.