११ वी कला,वाणिज्य, विज्ञान, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सन- २०१७-१८

इ. ११ वी कला,वाणिज्य, विज्ञान, आणि उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम
(नाशिक मनपा क्षेत्र वगळता)
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सन- २०१७-१८

Student Helpline Numbers : ७०३०९०८७४६, ७०३०९०८७४७, ७०३०९०८७४८, ७०३०९०८७४९
Email : help@mvp.edu.in

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक मनपा क्षेत्र वगळता कनिष्ठ महाविद्यालयातील इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी इ. ११ वी मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या www.online.mvp.edu.in या संकेत स्थळास भेट देवून मेरीट फॉर्म विहित मुदतीत भरावयाचा आहे. मा.शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेश प्रक्रीये विषयी सविस्तर माहिती संस्थेचे संकेत स्थळ www.online.mvp.edu.in वर उपलब्ध करून देण्यात येईल.

इ ११ वी २०१७-१८ च्या प्रवेशाचे वेळापत्रक
अं.क्र
तपशील
कालावधी

१.ऑनलाईन रजिस्ट्रेशन व मेरीट फॉर्म भरणे.
दि.२४ जून २०१७ सकाळी ९.०० वाजेपासून ते दि. २८ जून २०१७ सायं. ४.०० वाजे पर्यंत

२.अर्जाची छाननी करून संवर्गनिहाय प्राप्त अर्जनुसार सर्व विद्यार्थ्याची यादी संकेत स्थळावर व फलकावर प्रदर्शित करणे.
दि. ०३ जुलै २०१७ सकाळी ९.०० वाजता

३.संवर्गनिहाय पहिली गुणवत्ता यादी संकेत स्थळावर प्रदर्शित करणे.
दि. ०३ जुलै २०१७ सायं. ४.०० पर्यंत

४.पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व प्रवेश देणे.
दि.०४ जुलै २०१७ ते दि. ०६ जुलै २०१७ (वेळ सकाळी ९.०० ते दुपारी ४.००)

५.संवर्गनिहाय दुसरी गुणवत्ता यादी संकेत स्थळावर प्रदर्शित करणे.
दि. ०७ जुलै २०१७ सकाळी ९.०० वाजता

६.दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व प्रवेश देणे.
दि.०७ जुलै २०१७ सकाळी ९.०० ते सायं. ४.०० वाजे पर्यंत

७.रिक्त जागांची तिसरी प्रतीक्षा यादी संकेत स्थळावर प्रदर्शित करणे.
दि. ०८ जुलै २०१७ सायं. ४.०० वाजता

८.रिक्त जागांची तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देणे.
दि.१० जुलै २०१७ सकाळी ९.०० ते सायं. ४.०० वाजे पर्यंत

९.रिक्त जागांची चौथी प्रतीक्षा यादी संकेत स्थळावर प्रदर्शित करणे.
दि. ११ जुलै २०१७ रोजी सायं. ४.०० वाजता

१०.रिक्त जागांची चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देणे.
दि.१२ जुलै २०१७ सकाळी ९.०० ते सायं. ४.०० वाजे पर्यंत

११.प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतरही शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देणे.
दि. १३ जुलै २०१७ सकाळी ९.०० वाजे पासून दि.१९ जुलै २०१७ सायं. ४.०० पर्यंत
विद्यार्थ्यांसाठी सूचना

विद्यार्थ्यांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचून मेरीट फॉर्म अचूक भरावा.

१. विद्यार्थ्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या www.online.mvp.edu.in या वेबसाईटवर दि. २४ जून २०१७ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून दि. २८ जून २०१७ दुपारी ४.०० वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करावे.

२.रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना User ID व Password चा SMS मिळेल. सदर User ID व Password चा वापर करून विद्यार्थ्यांनी मेरीट फॉर्म वरील कालावधीतच ऑनलाईन भरावा. सदर User ID व Password डिलीट करू नये.

३. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रत्येक शाखेसाठी तीन महाविद्यालयांची निवड करता येईल.
४.मेरीट फॉर्म submit करण्यापूर्वी तो अचूक भरल्याची खात्री करून घ्यावी. त्यात काही चुका वा त्रुटी झाल्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहिल. महाविद्यालयात मेरीट फॉर्मची प्रिंट जमा करण्यापूर्वी online Edit करून विद्यार्थी चुकांची दुरुस्ती करू शकतो.

५.Submit केलेल्या मेरीट फॉर्मच्या दोन प्रिंट काढाव्यात. एक प्रिंट महाविद्यालयीन नोंदीसाठी जवळच्या मविप्रच्या महाविद्यालयात ARC सेंटर मध्ये जमा करावी. त्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी. दुसरी प्रिंट माहितीसाठी स्वतःजवळ जपून ठेवणे.
६.दि. ०३ जुलै २०१७ रोजी दुपारी ४.०० वाजता संवर्ग निहाय गुणवत्ता यादी संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात येईल व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्याना महाविद्यालयाकडून SMS येईल.

७. फक्त गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना आपल्या User ID व Password चा वापर करून www.online.mvp.edu.in या संकेत स्थळावर ऑनलाइन अॅडमिशन फॉर्म भरावा.
८.अॅडमिशन फॉर्मची प्रिंट व अॅडमिशनसाठी लागणारे मूळ प्रमाणपत्रे व प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रतीसह संबधित महाविद्यालयात जावून प्रवेश घ्यावा.

९. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी आय.टी / कॉम्प्यूटर सायन्स / इलेक्ट्रॉनिकस हे विषय उपलब्धतेनुसार स्वतंत्र अर्ज भरून घेऊ शकतील.

१०. वरील प्रक्रियेसाठी महाविद्यालयामध्ये ARC सेंटरला जावून विद्यार्थी नाममात्र शुल्क भरून आपला मेरीट फॉर्म भरू शकतील.(वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजे पर्यंत )

११. कला व क्रीडा प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला अनुक्रमे संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य अथवा सांस्कृतिक कार्य संचलनालयातील सक्षम अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी / विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडून प्रमाणपत्रे प्राप्त करून घेणे आवश्यक राहील.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.