11 सायकलपटूंनी पूर्ण केली 600 किमी सायकलिंग ब्रेवे; 7 जण ठरले सुपर रँडोनर्स

नाशिक : शनिवारी (दि. 22) नाशिक शहरातून आयोजित करण्यात आलेली 600 किमी बीआरएम राईड 11 सायकलिस्टसने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मुंबईकर असलेल्या एका सायकलिस्टसह नाशिककर सायकलिस्टस अशाएकूण 18 सायकलिस्टसने यात सहभाग नोंदविला होता. 11 nashik cyclists completed 600 km brm december 2018 cycling sports

ही राईड मुंबई नाका, नाशिक – धुळे – राष्ट्रीय महामार्ग 3 वरून इंदौर मार्गावरील घुलानिया (302 किमी) ते पुन्हा धुळे आणि नाशिक (604 किमी) अशा मार्गावर झाली. राईड यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी 40 तास (शनिवारी सकाळी 6 ते रविवारी 10 वाजेपर्यंत) असा वेळ देण्यात आला होता. नाशिकमधून सहभागी झालेले सर्व रायडर्स नाशिक सायकलिस्टसचे सदस्य आहेत.

शनिवारी (दि. 22) सकाळी 6 वाजता 18 सायकलिस्टने राईड सुरू केली. या सर्वांना कट आँफ टाईम ठरवून देण्यात आला होता. धुळे येथे संध्याकाळी 04:08, घुलाणीया (मध्य प्रदेश) येथे दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. 23) सकाळी 02:08 तर परत धुळे येथे दुपारी 12:08 अशी कटऑफ वेळ देण्यात आली होती. यात 11 सायकल पटूंनी हे सगळे पल्ले पार करत संध्याकाळी 7 ते रात्री 08:40 पर्यंत एकामागोमाग यशस्वी रित्या पार पाडले.

काही सायकलस्वरांनी केवळ 1 ते 4 तासांची झोप घेत व पुर्ण मार्गात छोटे खाण्या-पिण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी थांबण्याखेरीज, अखंड 600+ किमी अंतर निरंतर सायकल चालवून सदर बीआरएम पूर्ण केली. 11 nashik cyclists completed 600 km brm december 2018 cycling sports

11 nashik cyclists completed 600 km brm december 2018 cycling sports
राईड पूर्ण केल्यानंतर डॉ. महाजन यांच्यासह रायडर्स…

यात 7 सायकलस्वरांनी 300 ते 450+ एवढे अंतर पार करुन आपापल्या शारिरीक वा इतर कारणांमुळे राईडमधून माघार घेतली. तर 11 सायकलिस्टसने यशस्वीरित्या सगळे कंट्रोल पाँईन्ट सह राईड निर्धारित वेळेत पूर्ण केली.

चांदवड घाट, लळींग घाट व पळसनेर घाट (बीजासन माता मंदिर) अशा तीन घाटांचे आव्हान पेलले. चांदवडच्या घाटात सलगपणे असलेले मोठे चढ आणि उतार तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवर पालसनेर परिसरातील बिजासन माता मंदिर घाट पूर्ण करण्याच्या आव्हानांस सरस होत सायकलिस्टसने ही बीआरएम पूर्ण केली आहे.

अनेक रायडर्सला उत्तर महाराष्ट्रातील थंडीची लाट आणि मध्यप्रदेशातील दुपारचे उन्ह यांचा मोठा सामना सायकलिस्टसला करावा लागला. मोठी राईड असल्यामुळे टायर पंक्चर होणे, कधी अगदी ट्यूब बदलण्याची वेळ आली. मात्र या सर्व संकटांना तोंड देताना शारीरिक व मानसिक तयारी आणि जिद्द, चिकाटीचा कस लागतो असे मत या राईडचे आयोजक डॉ. महेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे यात दिनकर पाटील व मानिक निकम यांनी सिंगल स्पिड (गिअर शिवाय) टँडम सायकलवर पुर्ण केले. तसेच भिमराव अडाव यांनी ही सिंगल स्पिड (गिअर शिवाय) सायकलवर पुर्ण केले.

तसेच या बीआरएम चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रतन अनकोलेकर, डॉ. राहूल सोनावणी, गोरकक्षनाथ शिंदे, गणेश माळी, हिरेण संघवी (मुंबई), आशिष भट्टड, दिनकर पाटील या 7 सायकलिस्टसने 2018-2019 या कॅलेंडर मधील सुपर रँडोनर्स हा बहुमान पटकावला. यात वर्षभरात 200, 300, 400, 600 किमीची हे ब्रेवे पुर्ण केल्यास एक सुपर रँडोनियरचा बहुमान मिळतो. यांच्यासह रामदास सोनावणे, समीर मराठे, मानिक निकम व भिमराव अडाव अशा 11 सायकलीस्टनी ब्रेवे 600 पुर्ण केली.

ही राईड ऑडेक्स क्लब पॅरिसीएन, फ्रान्स यांच्या माध्यमातून ऑडेक्स इंडिया रँडोनर यांच्याशी संलग्न असून गेल्या एक वर्षादरम्यान 200 किमी, 300 किमी, 400 किमी आणि 600 किमीची राईड पूर्ण करणाऱ्या रायडरला एसआर अर्थात सुपर रँडोनर हे शीर्षक मिळवण्याची अजूनही संधी मिळणार आहे.

भाग घेतलेले सायकलपटू :

रतन अनकोलेकर, डॉ. राहूल सोनावणी, गोरकक्षनाथ शिंदे, गणेश माळी, रामदास सोनावणे, हिरेण संघवी (मुंबई), दिपक वाघ, नितीन देशमुख, समीर मराठे, अशीश भट्टड, सत्यजीत दातीर, अभिजीत मोरे, दिनकर पाटील, मानिक निकम, साहेबराव कासव, निखील भावसार, भिमराव अडाव व मोहनसिंग राजपूत.

या सायकलिस्टसने पूर्ण केली 600 किमीची बीआरएम :

रतन अनकोलेकर, डॉ. राहूल सोनावणी, गोरकक्षनाथ शिंदे, गणेश माळी, हिरेण संघवी (मुंबई), आशिष भट्टड, दिनकर पाटील, रामदास सोनवणे, समीर मराठे, मानिक निकम व भिमराव अडाव

यावेळी संपूर्ण राईडमध्ये रायडर्सची काळजी घेणारे मार्शल्स तसेच आयोजन करण्यास यशवंत मुधोळकर व संदीप परब यांचे मोलाचे सहकार्य डॉ. महेंद्र महाजन यांना मिळाले. सर्व फिनिशर रायडर्सचे स्वागत नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया आणि सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.

11 nashik cyclists completed 600 km brm december 2018 cycling sports

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.