सात सायकलिस्टसने पूर्ण केली १००० किमी सायकलिंग ब्रेव्हे

एकाच वर्षात सात रायडर्सने १००० किमी ब्रेव्हे पूर्ण करण्याची पहिलीच घटना

नाशिक : नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली १००० किमी सायक्लिंग ब्रेव्हे सात सायकलिस्टसने निर्धारित वेळेत पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्टसने या ब्रेव्हेसाठी नोंदणी करून सुरुवात केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी केवळ ६२ तासात नाशिक – रतलाम (मध्यप्रदेश) – नाशिक हे १००० किमीचे अंतर पूर्ण केले. तर अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अॅड. दत्तात्रेय चकोर, पुण्याचे अमोल कानवडे यांनी ७४ तासात तर मुंबईचे सचिन भोसले यांनी ७४.५ तासात ब्रेव्हे पूर्ण केली. 1000km brevet seven nashik cyclists audax india randonneurs parisien air 

1000 km brevet seven nashik cyclists audax india randonneurs parisien air नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशन डॉ. महेंद्र महाजन ब्रेव्हेट सायकलिंग आनंद गांगुर्डे अनिल कहार किशोर काळे विजय काळे अॅड दत्तात्रेय चकोर Dattatray Chakor Anil Kahar Nikhil Bhavsar (crew) Dr Mahendra Mahajan (organiser) Kishor kale
Anand Gangurde’s Ride On Strava App for Cyclists

शुक्रवारी (दि. २२) ही १००० किमीची ब्रेव्हे मुंबई नाका, नाशिक येथून सकाळी ६ वाजता सुरु करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरून सरळ मध्य प्रदेशातील मानपूर – रतलाम आणि पुढे नामली नावाच्या गावी (जे नाशिकपासून ५०३ किमी आहे), तेथून यु टर्न घेत त्याच मार्गाने सायकलिस्टस नाशिककडे परतले. एकूण १००६ किमी. चे अंतर पूर्ण करण्यासाठी ७५ तासांची वेळ दिलेली होती यात झोप, पोषण आणि नैसर्गिक विधींना लागणाऱ्या वेळेचा समावेश आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ब्रेव्हेच्या मार्गावर एक वाहन उपलब्ध होती. यात निखिल भावसार आणि संदीप परब यांनी पूर्ण ७५ तास सायकलिस्टसची देखरेख पाहिली.

नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने डॉ. महेंद्र महाजन गेल्या ४ वर्षांहून अधिक काळापासून सायकलिंग ब्रेवे (वेळबद्ध आणि स्वावलंबी सायकॉलॉथन्स) सुरु केले आहेत. हे ब्रेव्हे ऑडेक्स इंडिया रँडेनॉर आणि ऑडेक्स क्लब पॅरिसन, फ्रान्स यांच्याश संलग्न आहेत. पहिली २०० किमीची ब्रेव्हे एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आली होती. यानंतर डॉ. महाजन यांनी नाशिक परिसरातील विविध मार्गांवर २००, ३००, ४०० आणि ६०० किमी ब्रेव्हे यशस्वीरित्या आयोजित केल्या आहेत. या सर्व ब्रेव्हेचे मार्ग नाशिक शहरातून सुरू होत शहरातच समाप्त होणारे (रिटर्न लूप) आहेत.

नाशिकच्या ११ सायकलिस्टसने पूर्ण केलीय १००० किमी ब्रेव्हे 1000km brevet seven nashik cyclists audax india randonneurs parisien air

आत्तापर्यंत नाशिकमधील ११ सायकलिस्टसने १००० किमीची ब्रेव्हे पूर्ण केली असून त्यात डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, मोहिंदरसिंग भराज यांनी २०१४ मध्ये तर श्रीनिवास गोकुळनाथ यांनी २०१५ मध्ये, ज्ञानेंद्र शर्मा यांनी २०१६ मध्ये तर आज आनंद गांगुर्डे, अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अॅड. दत्तात्रेय चकोर यांनी १००० किमी ब्रेव्हे पूर्ण केली आहे.

Quote By Dr. Mahendra Mahajan (Organise of Brevets in Nashik) :

12 riders started 1000 km brevet on 22nd Dec morning 6 am from Mumbai Naka to Ratlam and return from Ratlam to Nashik. The nights were very cold and challenging to ride. Days were relatively pleasant. Climb on the route : there were 3 ghats – Chandvad, Palasner and Manpur ghat. Total elevation gain was 8698 meter which is almost equal to climb Mount Everest.

Finishers : Anand Gangurde finished in 62 hrs, Anil Kahar, Kishor Kale, Vijay Kale, Dattatray Chakor, Amol Kanawade in 74 hrs, Sachin Bhosale in 74.5 hrs.

I left the brevet at 520 km (in 29 hrs) due to severe saddle soreness, as I was using a new saddle. Which was a mistake to do so. 2 riders left brm due to fall and 2 could not make it in time at half way mark.

Nikhil Bhavsar and Sandip Parab, worked relentlessly for 75 hrs as marshals in support vehicle, taking care of riders. 1000km brevet seven nashik cyclists audax india randonneurs parisien air

जाणून घ्या नाशिकच्या घडामोडी फेसबुकवर – NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “सात सायकलिस्टसने पूर्ण केली १००० किमी सायकलिंग ब्रेव्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.