एप्रिल पासून गोदावरी प्रदूषण करणाऱ्याना दंड

एप्रिल पासून गोदावरी प्रदूषण करणाऱ्याना दंड
नाशिक : उच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे आता महापालिका गोदावरी प्रदूषण करण्याऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करणार आहे. ही दंडात्मक कारवाई एक एप्रिल पासून लागू होणार आहे. यामध्ये नदीपात्रात कोणत्याही प्रकारे घाण अथवा अशुद्धता करता येणार नाही.या प्रकारचे आदेश महापलिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे.
गोदावरी नदी पात्रात कचरा टाकणारे, कपडे व वाहने धुवणारे यांच्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यात पहिला गुन्हा करणार्‍यास 1 हजार आणि त्यानंतर त्याच व्यक्तीने दुसर्‍यांदा हा गुन्हा केल्यास त्यास 5 हजार रुपये दंड केला जाणार असल्याची माहिती आज महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.या अगोदर नाशिक पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केली होती मात्र कोणताही फरक पडत नव्हता, त्यामुळे आता दंडाची रक्कम वाढवली असून   माजी सैनिकांची मदत घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.
ओला आणि सुका कचरा
घंटा गाडीमध्ये कचरा देताना आता ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा केला जाणार आहे. नागरीका सर्व प्रकारचा कचरा एकत्र देत होते त्यामुळे अनेक अडचणी समोर उभ्या राहिल्या तर या कचर्याचीचा उपयोग खत प्रकल्पात केला जाणार असून त्या करिता हा कचरा वेगळा गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
ओला व सुका कचरा एकत्रित घंटागाडीत टाकल्यास नागरिकांना  500 रुपयांचा दंड केला जाणार आहे.तर  घंटागाडी चालकांनी ओला व सुका कचरा एकत्रीत घेतल्यास ठेकेदारास 5 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.