संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा सुरु

त्र्यंबकेश्वरमध्ये भरला संतांचा मेळा संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा सुरु

नाशिक : नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरनगरी अवघी टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष रंगून गेली आहे. दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे भरणारी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारपासून सुरु होत आहे. यासाठी नाशिक शहर मार्गे दिंडय़ा-पताकांसह हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. आता शुक्रवार १२  जानेवारीला पहाटे चार  वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शासकीय पूजा केली आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये ११ ते१३ जानेवारी या कालावधीत यात्रोत्सव आहे. तर १२जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रोत्सवासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी संप्रदाय, तसेच भाविक मोठय़ा संख्येने येतात. याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथील मराठी भाविकही त्र्यंबकनगरीत दाखल होत असतात. पौष वैद्य एकादशी म्हणजेच षटतिला एकादशी या दिवशी संपणारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची तीन दिवसीय यात्रा आहे. ज्ञानोबा माऊलींचे गुरू आणि वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक संत निवृत्तीनाथ यांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी समाधी घेतली होती. याच समाधीस्थळावर दरवर्षी तीन दिवसांची ही यात्रा होते. यात्रेसाठी संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर ट्रस्टतर्फे व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे यात्रेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, यावेळी निर्मळवारीची संकल्पना घेऊन यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने आठवडाभर नामवंत प्रवचनकार त्र्यंबकेश्वरमध्ये अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.