श्री.नारोशंकर मंदिरामागील हळदी-कुंकू, रूखवत विक्रेत्यांची १२ दुकानं अज्ञातांनी जाळली

आता दुकानांची जाळपोळ सुरु: गोदावरी पत्रातील 10 ते 12 दुकानं अज्ञातांनी जाळली

नाशिक – नाशिक मध्ये दहशत माजावी, बदला घेतला जावा अथवा त्रास दिला जावा यासाठी रात्री अनेकदा समाजकंटकांनी गाड्या, रिक्षा जाळल्या आणि कारच्या काचा फोडल्या आहेत. हा वाईट प्रकार नशिकमध्ये सुरु झाला आणि पूर्ण राज्यात पसरला आहे. आता दुर्दैवाने पुन्हा जाळपोळ प्रकार घडला असून यावेळी मात्र गोदावरी नदी पात्रात मादिरांशेजारी असलेल्या दुकाने जाळण्यात आली आहेत. मध्यरात्री तीन वाजता श्री नारोशंकर मंदिरामागील हळदी कुंकू, रूखवत विक्रेत्यांची 10 ते 12 दुकानं अज्ञातांनी जाळली आहेत. यामध्ये गरीब दुकानदारांचे नुकसान झाले आहे.

पहाटे हा प्रकार समोर आला, अचानक दुकानातून धूर आणि आग दिसू लागली होती. नागरिकांनी लघेच पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळविले होते. अग्निशमन दलाने जवळपास दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नातून ही आग विझवली आहे. यामध्ये राम सेतू शेजारील जवळपास सर्वच दुकाने जळाली आहे. विशेष म्हणजे ही दुकाने लाकडांची होती त्यामुळे पटकन पेटली आहेत. नागरिकांनी आणि दुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे. गर्दुले आणि बेवडे या ठिकाणी रात्री येतात त्यामुळे हा प्रकार झाला असावा असे नागरीका म्हणत आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून चोकशी सुरु केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.