वेगवेगळ्या घटनात एका महिलेची आणि अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वेगवेगळ्या घटनात एका महिलेची आणि अल्पवयीन मुलीची आत्महत्या

नाशिक : दोन वेगवेगळ्या घटनामध्ये एका महिलेने आणि एका अल्पवयीन दिव्यांग असलेल्या मुलीने आत्महत्या केली आहे. प्रथम घटनेत चांदवड तालुक्यातील कोकणखेडे येथील पल्लवी लालचंद सोनवणे (वय १६ वर्ष) या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार सदर तरुणी अपंग होती, अपंगत्वाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते आहे. तर दुसऱ्या घटनेत शहरातील असलेल्या नाशिक रोड येथील बोधलेनगर परिसरातील ड्रीमसिटीत वसाहतीत राहत असलेल्या  इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एका महिलेने उडीमारूत आत्महत्या केली आहे.
रूचि मनीष शहा (३३, रा. बेलापूर, नवी मुंबई) या महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ड्रिमसिटी परिसरात रहाणार्‍या नागरिकांनी गर्दी केली. मात्र या महिलेने आत्महत्या का केली. याबाबतचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. प्रकरणी उपनगर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.