लष्करी हद्दीलगतच्या बांधकाम परवानगीचा प्रश्न मार्गी

खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश

नाशिक – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल नाशिकच्या लष्करी हद्दीलगत चा बांधकामाच्या परवानगीबाबत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्न व   क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पाठपुराव्यास यश आले असून लष्करी हद्दी पासून एक मीटर ते पाचशे मीटर पर्यंतच्या चार मजले किंवा 15 मीटर उंचीपर्यंत विकसन परवानगीसाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्राची आता आवश्यकता असणार नाही अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले  या निर्णयामुळे या भागात घरकुलांसाठी गुंतवणूक करून बांधकाम परवानगी न मिळालेल्या नागरिकांना दिलासा  मोठा मिळाला असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या समस्येबाबत क्रेडाई नाशिक मेट्रोच्या एका शिष्टमंडळाने फेब्रुवारी महिन्यात खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचीदेखील भेट घेतली होती व व संबंधितांना याबाबत निर्देश देण्याची विनंती देखील केली होती.


29 जून रोजी स्थानिक स्टेशन कमांडंट यांना खासदार हेमंत गोडसे यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना स्टेशन कमांडट यांनी हे निर्बंध शिथिल केल्या ची माहिती दिली. या साठी  क्रेडाई नाशिक मेट्रो ने देखील स्टेशन कमांडंट याना विनंती केली होती .स्टेशन कमांडंट यांच्या  पत्राचा संदर्भ घेऊन क्रेडाई नाशिक मेट्रोचे शिष्टमंडळ महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना भेटले व रखडलेल्या बांधकाम परवानग्या देण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात  क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील ,सहसचिव अनिल आहेर तसेच आनंद ठाकरे व हंसराज देशमुख हे उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.