मिशन झिरो नाशिक अंतर्गत सावरकर सभागृह इंदिरानगर येथे उत्तम प्रतिसाद

नाशिक : मिशन झिरो नाशिक संपूर्ण शहरात तपासणी शिबिर सुरू आहेत.आज सावरकर सभागृह, इंदिरानगर येथे नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ॲड.अजिंक्य साने यांनी आयोजित केलेल्या कोरोना रॅपीड ॲटीजेन टेस्ट वैद्यकीय शिबिरात वैद्यकीय पथकाकडुन तपासण्या करण्यात आल्या.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.प्रा.देवयानी फरांदे यांची टेस्ट करण्यात आली.त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून सहकार्य करावे असे आवाहन आ.फरांदे यांनी केले.

सभागृह नेते सतिश(बापू) सोनवणे यांनी देखील शिबिरास भेट दिली,यावेळी नगरसेवक ॲड.अजिंक्य साने,नगरसेवक चंद्रकांत खोडे,भाजपा द्वारका मंडल अध्यक्ष सुनील देसाई,सचिन कुलकर्णी,सरचिटणीस उदय जोशी,रुपाली नेर,राजश्री भावसार,शैला विसपुते,धीरज वझरे,संजय शिंदे,संतोष करणकाळ,ज्योती वाईकर,दर्शन हिरे,वाल्मिक पाखले आदी उपस्थित होते.यावेळी ११६ तपासण्या करण्यात आल्या त्यात ३ रूग्ण बाधित आले आहेत.बाधित आलेल्यांचे समुपदेशन करून त्यांना तात्काळ डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय येथे पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले.यावेळी वैद्यकीय पथकात सहभागी अधिकार्यांचे गुलाबपुष्प देऊन आभार मानण्यात आले

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.