मालेगावमध्ये आमदार मौलाना मुफ्ती मो. राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्याला धक्काबुक्की, गुन्हा दाखल

देशभरात संचारबंदी लागू असतांना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मालेगांव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मो. यांच्या समवेत २० ते २५ राजकीय कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. याप्रकरणी डॉ. डांगे यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रात्री ८ वाजता सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या दोघा संशयीत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. सामान्य रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यरत असतांना आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल हे रुग्णालयात आले. यावेळी त्यांच्या समवेत सुमारे २० ते २५ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते. यामध्ये प्राध्यापक रिजवान अमानुल्ला खान अजमल अन्सारी, नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, नईम अहमद, युसुफ इलियास यांचा समावेश होता. हे सर्वजण अनाधिकाराने  वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी आरडाओरड व मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्णालयातील इतर महिला व पुरुष डॉक्टर्स, वॉर्डबॉय, नर्सेस झाले.

यावेळी आमदारांसोबतच्या काही कार्यकर्त्यांनी डॉ. डांगे, डॉ. पाटील यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यामुळे भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी काम बंद करुन रुग्णालयासमोर ठिय्या मांडून होत असलेल्या अन्यायाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा ठिय्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना असा प्रकार घडल्यामुळे आमदार मुफ्ती मोहम्मद यांच्यासह समर्थकांवर भा द वी ३५३, ३३२ ३४१, ३४२, ४१२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख तपास करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.