कोपर्डी बलात्कार प्रकरण
दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार
कोपर्डी बलात्कार प्रकरणाला आता ८० दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजून चार्जशीट दाखल करण्यात आलेले नाही. नियमाप्रमाणे एखाद्या गुन्ह्यात ९० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झाले नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आता दोन दिवसात चार्जशीट दाखल झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. नाशिकमध्ये एका बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयावर मते मांडली. मुख्यमंत्र्यावर टीका करतांना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांकडे कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या तक्रारीची दखल घ्यायला वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला जमत नाही असे सांगितले. तर शिवसेनेवर टोला लगावत तुम्हाला पण लेकी सुना आहेत. स्वाभिमानी महिलाचा स्वाभिमान दुखावू नका असे बोलल्या.