दादासाहेब चित्रनगरी लवकरच निसर्गरम्य इगतपुरी येथे !

नाशिक : चित्रपटमहर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कै.दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीत नाशिक येथील इगतपुरी येथील निसर्गरम्य ठिकाणी लवकरच चित्रनगरी उभारण्यात येणार आहे.या करीता सुमारे ८२ कोटी रुपये खर्च येणार असून या करिता चित्रपट महामंडळाने हिरवा कंदील दिला आहे. यासाठीची अधिकृत माहिती खा.हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

इगतपुरी येथील सांजेगाव येथे क्षेत्र ५४ आर या जागेत हि चित्रपट नगरी असावी असा प्रस्ताव हेमंत गोडसे यांनी राज्य सरकारला दिला होता.तर सपूर्ण प्रस्ताव आता पूर्ण झाला असून त्याला लवकरच परवानगी मिळणार आहे अशी माहिती गोडसे यांनी दिली आहे.तर चित्रपटनगरीचा नियोजित प्रकल्पाचा अहवाल बांधकामासाठीचा खर्च चित्रपट महामंडळ करणार आहे.सोबतच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चत्रे यांनी दि. 7 जुलै 2016 रोजी जिल्हाधिकारी यांना तसे पत्र दिले आहे.त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.