कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाºया कामगारास  अटक 

मनपाच्या कथडा येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाºया सफाई कामगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान,या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

 कोरोना रूग्णावर मनपा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग
नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरातील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपाच्या एका सफाई कर्मचाऱ्याने येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित महिला रुग्णाला स्वच्छतागृहाजवळ स्त्री जातीला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. संशयित कर्मचाऱ्याविरुध्द रुग्णालयातील डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमध्ये  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. एक कोरोनाबाधित महिला रुग्ण स्वच्छतागृहात गेली असता संशयित आरोपी मनपा सफाई कर्मचारी कैलास बाबुराव शिंदे (५६) याने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर बाहेरून लाथ मारून महिला रुग्ण आतमध्ये असतानासुध्दा लघवी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच महिलेला बघून अश्लील कृत्य केले. सदरच्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता संशयित आरोपी शिंदे याने तेथून पळ काढला. या घटनेनंतर मनपाचे डॉ. विशाल बेडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी शिंदे याच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, फरार संशयित शिंदे याचा पोलीस शोध घेत आहेत.
सरकारने तत्काळ SOP जाहीर करावी – चित्रा वाघ
या घटनेनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची सरकारवर कठोर टीका केली आहे. राज्यात कोरोना बाधित महिला असुरक्षित नसून सरकारी रुग्णालयात आतापर्यंत 10 ते 12 घटना घडल्या आहेत. यामुळे सरकारने तत्काळ SOP जाहीर करावी असे त्यांनी म्हटले आहे. सरकारला महिला सुरक्षा महत्वाची वाटत नाही का? असा खडा सवाल देखील वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच दोषी फक्त कर्मचारीच नाही तर रुग्णालय प्रशासकीय अधिकारीही याला जबाबदार असून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.