अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई : गुन्हा दाखल

ज्य सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित केल्यानंतर आर्थिक व्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे आमचा जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असताना काही व्यक्तींच्याकडून सोशल मीडियात लॉकडाऊनबाबत अफवा पसरवून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची कडक शब्दात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले  आहे.
लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात जनजीवन सुरळीत होण्यासह अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले जात आहे. पण काही व्यक्तींकडून अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. यात सोशल मीडियात दुचाकी, चारचाकी वाहने पूर्ण बंद, दुकाने बंद, पुन्हा पहिल्या लॉकडाऊन प्रमाणेच बंधन येणार असून नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावांनी हे संदेश पसरवले जात आहेत. यामुळे या प्रकारची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी अफवेला खतपाणी घालून नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.त्यामुळे नागरिकांनी कुठलीही माहिती फॉरवर्ड करताना शहनिशा करून ती पुढे पाठवावी अन्यथा जर ही अफवा असली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

नाशिक बंदबाबत अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे
नाशिक बंद असल्याची पसरवली होती अफवा
तलाठी आनंद मेश्राम यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांत दिलेली फिर्याद पुढील प्रमाणे :

सरकारवाडा पो.ठाणे, नाशिक
दि.21/05/2020माझे नाव, आंनद चक्रधर मेश्राम वय-54 धंदा-नोकरी (नाशिक शहर तलाठी-3) रा. फ्लंट18 भारती पार्क मातोश्रीनगर, उपनगर नाशिक शहर मो.क्र. 8$$$$$$$$$$
मी सरकारबाडा पोलीस ठाणेस हजर राहून सरकार तर्फ फिर्याद लिहुन देतो. मी वरिल ठिकाणीमाझे कुटुंब राहवयास असुन मी नाशिक शहर येथिल विभाग 03 येथे तलाठी मणून कार्यरत असूनमाझे कार्यालय जिलाधिकरी कार्यालय कंपाऊड मचे आहे.
मा. जिल्हाधाकारी सो। नाशिक यांनी कोरोना या रोगाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालु असलेल्यालॉक-डाऊन कालावधित कोणत्याही प्रकारचे खोटे अगर भित्ती पसरवणारे संदेश प्रसारित करु नयेयासाठी वेळो-वेळी फो. प. स. कलम 144 अन्वये नोटीस काढून त्याची प्रसिद्धी केली आहे.
आज दि. 21/05/2020 रोजी 15.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात कामावर असताना श्रीअनिल दोडे सो। तहसिलदार नाशिक, यांनी कळविले की, मा. जिल्हाधिकारी सो। नाशिक यांचेमोबाईल क्र. 94########## यावर तसेच नाशिक शहरातील इतर व्हाट्स अप ग्रुप वर अज्ञात इसमानेउद्या शुक्रवार दि. 22/05/2020 ते रविवार दि. 31/05/2020 पर्यंत अत्यावश्यक वजिवनावश्यक बस्तु बगळता संपुर्ण नाशिक बंद- मा. सुरज मांढरे , जिल्हाधिकारी तथाजिल्हादंडाधिकारी नाशिक, असा त्याचे नावाने चुकीचा/खोटा संदेश प्रसारित केला आहे. त्याबाबतआमचे कार्यालयाने सखोल चौकशी केली असता वर नमुद केलेल्ने संदेशाप्रमाणे मा. जिल्हाधिकारी सो।यांनी असा कोणताही आदेश दिला नसताना सदर संदेश खोटा असताना त्याव्दारे समाजात संभ्रमनिर्माण होवुन भितीचे वातारवण निर्माण व्हावे यासाठी प्रासारित केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरअज्ञात इसमविरुध्द कायदेशिर तक्रार देण्यासाठी आमचे कार्यालयाकडिल पत्र क्र.एमएजी/कावी/69172020 नाशिक दि. 21/05/2020 व्दारे माझी नेमणूक केली. म्हणून मी अज्ञातइसमाचे विरोधात तक्रार देण्यासाठी आली आहे.
तरी आज दि. 21/05/2020 रोजी 15.00 वा. चे पूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने मा.जिल्हाधिकारी सो। नाशिक यांचे मोबाईल वर व तसेच नाशिक शहरातील इतर व्हाट्स-अप ग्रुप वरउद्या शुक्रवार दि. 22/05/2020 ते रविवार दि. 31/05/2020 पर्यंत अत्यावश्यक वजिवनावश्यक वस्तु वगळता संपुर्ण नाशिक बंद- मा. सुरज मांडरे , जिल्हाधिकारी तथाजिल्हादंडाधिकारी नाशिक, असा मा. जिल्हाधिकारी सो। नाशिक यांचे नावाने चुकीचा / खोटा संदेशतयार करुन तो व्हाट्स-अप व्दारे प्रसारित करुन समाजात संभ्रम निर्माण करुन भितीचे वातावर तयारकेले म्हणुन माझी सदर अज्ञात इसमाचे विरोधात कायदेशिर तक्रार आहे.
माझी वरिल फिर्याद मराठीत संगणकावर टंकलिखित केली असुन ती मी वाचुन पाहीली असताती माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.